निवडणूक काळात अनिल देशमुखांचं नवं पुस्तक, अत्यंत धक्कादायक खुलासे; ईडीवर गंभीर आरोप...
महाराष्ट्र,मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवं पुस्तक येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नवं पुस्तक येत आहे. या पुस्तकातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. अनिल देशमुख यांनी ईडीवर गंभीर आरोप केलेत. वाचा सविस्तर...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणूक काळात एक
पुस्तक प्रकाशित होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नवं पुस्तक
वाचकांच्या भेटीला येत आहे. ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ असं अनिल देशमुख यांच्या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाचं
मराठी, हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीचं कव्हर पेज समोर आलं आहे. या पुस्तकातील
काही पानं टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहेत.
या पुस्तकातून काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. अनिक देशमुख यांनी ईडीवर
गंभीर आरोप केले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, या पानांपैकी काही २०
प्रकरणांपैकी एका प्रकरणाचे आहेत, ज्यामध्ये देशमुख यांनी एका
अधिकाऱ्याच्या हवाल्याने केंद्रीय यंत्रणा ईडीविरुद्ध गंभीर आरोप लावले आहेत. या
प्रकरणाचे नाव आहे: “ईडी – वरून प्रेशर आहे,” ज्यात देशमुख यांनी २०२१
सालच्या दिवाळीच्या दिवशी ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांची अटक कशी झाली, याचा उल्लेख केला आहे.
देशमुख यांच्या या पुस्तकात त्यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळातील
काही महत्त्वाचे घटनांचा उलगडा होऊ शकतो, जसे की मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर
स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवणे, मनसुख हिरेन हत्याकांड, सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्याशी संबंधित बाबी. देशमुख यांच्या
या पुस्तकामुळे नवीन वाद निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर पुस्तकाच्या प्रकाशनाची
वेळही चर्चेचा विषय बनली आहे.
0 Response to " निवडणूक काळात अनिल देशमुखांचं नवं पुस्तक, अत्यंत धक्कादायक खुलासे; ईडीवर गंभीर आरोप... "
टिप्पणी पोस्ट करा