मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

“महसूल पंधरवडा” अंतर्गत कल्याण तालुक्यातील जांभूळ येथे विविध उपक्रमांचे आयोजन...

“महसूल पंधरवडा” अंतर्गत कल्याण तालुक्यातील जांभूळ येथे विविध उपक्रमांचे आयोजन...


ठाणे, :- “महसूल पंधरवडा” अंतर्गत दि. 2 ऑगस्ट रोजी कल्याण तालुक्यातील जांभूळ येथे आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, वृक्षारोपण, विविध दाखल्यांचे वाटप असे विविध उपक्रम संपन्न झाले. 

      यावेळी उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) संजय बागूल, तहसिलदार सचिन शेजाळ, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने, सरपंच परिक्षित पिसाळ, उपसरपंच अशोक शिंदे व ग्रामपंचायत इतर सदस्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व जांभूळ ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. 

      जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांच्या हस्ते महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तीन हेक्टर क्षेत्रावर बांबू वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे हिंदुस्तान पेट्रोलियम ऑईल कंपनीच्या सहकार्याने सीएसआर निधीच्या माध्यमातून दहा हेक्टर क्षेत्रावर जांभूळ वृक्ष लागवडीचा शुभारंभही करण्यात आला. या माध्यमातून शासकीय गुरचरण जमिनीवर जवळपास 15 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

     या उपक्रमानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” त्याचप्रमाणे “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” या दोन्ही योजनांची माहिती देवून या दोन्ही योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याकरिता आवाहन केले.

     याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना दाखले वाटप, आदिवासी महिलांना रेशनकार्ड वाटप, जन्म-मृत्यू दाखल्यांचे वाटप, बचतगटांना फिरत्या निधीचे वाटप, श्रावण बाळ व संजय गांधी योजनेचा लाभ वाटप हे लाभ वाटपही करण्यात आले.

0 Response to "“महसूल पंधरवडा” अंतर्गत कल्याण तालुक्यातील जांभूळ येथे विविध उपक्रमांचे आयोजन..."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...