
छगन भुजबळ यांना मंत्रिपद, मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया...
महाराष्ट्र : ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा फडणवीस मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यानंतर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा
फडणवीस मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ मंगळवारी घेतली.
त्यावेळी भुजबळ यांचे कट्टर विरोधक अन् मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील
यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छगन भुजबळ मंत्री झाले तरी आम्हाला काहीच फरक
पडत नाही. परंतु, अजित पवार जातीवादी लोकांना
पोसायचे काम करत आहेत, असे मनोज जरांगे पाटील
यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे
पाटील यांनी सांगितले की, छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घ्यावी की नाही? हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. परंतु अजित पवार मोठी चूक करत
आहेत. या चुकीच्या परिणामाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. जो मराठ्यांच्या
आरक्षणाला विरोध करत आहे, त्याला मंत्रिपद दिले जात आहे. भुजबळ
मंत्री होत असल्याने आम्हाला काहीच फरक पडणार नाही, असा दावाही मनोज जरांगे यांनी केला आहे.
सर्व आमदारांकडून विरोध हवा होता
अजित पवार यांच्यावर टीका करताना मनोज
जरांगे म्हणाले, अजित पवार हे जातीयवादी लोकांना पोसण्याचे काम करत आहेत. त्याची
किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्यामुळे
छगन भुजबळ यांना तात्पुरता आनंद दिला असणार आहे. छगन भुजबळ यांना चॉकलेट दिले
असणार आहे. परंतु लवकरच छगन भुजबळ यांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. छगन भुजबळ
जातीयवादी आहेत. त्यांना मंत्रिपद देऊ नका, असा विरोध अजित पवार यांच्या पक्षातील
सगळ्या आमदारांनी करायला पाहिजे होता, अशी अपेक्षा मनोज जरांगे यांनी व्यक्त
केली.
भुजबळांना मंत्रिपद दिल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, छगन भुजबळला मंत्रीपद देणे हा देवेंद्र फडणवीस यांचा डाव असू
शकतो. मराठा संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीस
यांना एकनाथ शिंदे यांनी प्रवाहात आणले. परंतु आता एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांनी
बाहेर टाकले आहे.
0 Response to "छगन भुजबळ यांना मंत्रिपद, मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया... "
टिप्पणी पोस्ट करा