मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जिल्हा नियोजन भवनाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

जिल्हा नियोजन भवनाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.


नागपूर विशेष प्रतिनिधी : 

जिल्ह्यातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, सर्व मतदारसंघात चांगले काम झाले पाहिजे. निधीच्या सुयोग्य वापरासाठी समन्वय,सुसूत्रता व काटेकोर नियोजन अधिक प्रभावी झाले पाहिजे.- उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस


नागपूर जिल्ह्यातील प्रशासकीय इमारतींच्या वैभवात भर घालणाऱ्या जिल्हा नियोजन सभागृहाच्या लोकार्पणानंतर या नुतन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तृतीयपंथीयांना विविध लाभाचे वाटप तसेच आदिवासी विद्यार्थींना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. 


यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, विधान परिषद सदस्य सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण दटके, अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, परिणय फुके, कृपाल तुमाने, विधानसभा सदस्य सर्वश्री अनिल देशमुख, डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, समीर मेघे, ॲड. आशिष जायस्वाल, टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, पोलिस आयुक्त डॅा. रवींद्र कुमार सिंगल, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्य यांच्यासह संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेचे विभागप्रमुख उपस्थित होते.

0 Response to "जिल्हा नियोजन भवनाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...