
आ.महेश बालदी किती खरे किती खोटे ? रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील
उरण प्रतिनिधी/ एम.डी.भोईर : दोन दिवसांपूर्वी विधानसभेत आ.महेश बालदी यांनी "गावठाण वाढीचा " विचार मांडून त्या भीम
पराक्रमावर वर्तमान पत्रे आणि सोशल मिडियावर मोठी प्रसिद्धी मिळविली.त्यावेळी थोडं मलाही बरं वाटलं.पण त्यांच्या साडेचार वर्षाच्या अंतरानंतर अचानक झोपेतून उठून प्रकल्पग्रस्तांसाठी गावठाण वाढीच्या प्रश्नावर कृतीसाठी विचार मांडले होते का ?अशी शंका मला आली.
कारण,खरं म्हणजे ते प्रकल्प ग्रस्तांचा पाप ( pap )म्हणजे " प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन " असे न बोलता पाप असा उल्लेख जेएनपीटी ट्रस्टी च्या मिटिंगमध्ये करायचे ,या संबंधीची माहिती विश्वस्त दिनेश पाटील यांनी काही वेळा आपल्या भाषणात जाहीर दिली होती.त्या "पाप" असलेल्या पापी प्रकल्पग्रस्तांच्या गावठाण वाढीबद्दल विचार विधानसभेत मांडल्यानंतर खरंच त्यांचे प्रकल्प ग्रस्तांविषयी खरंच प्रेम आहे की प्रकल्पग्रस्तांना ते गावठाण उशिरा मिळण्यासाठी वेगळी चाल आहे ?
कारण, गावठाण वाढ हा १९७० पासूनचा येथील प्रकल्पग्रस्तानचा जिवाळ्याचा आहे.त्यासाठी काही कार्यकर्ते,काही गावे,काही संघटना,अगदी बबन पाटील, कामगार नेते सुरेश ठाकूर इत्यादी नेत्यांची महामुंबई प्रकल्प ग्रस्त संघटना लढत आले आहेत.याच माध्यमातून आजचे मुख्यमंत्री शिंदे,हे नगरविकास मंत्री असताना मुंबईत सर्व अधिकारी समवेत प्रकल्पग्रस्त नेत्यांसोबत मिटिंग झाली होती.त्यावेळी मी सुध्दा हजर होतो.त्या सभेत मंत्री एकनाथ शिंदे यांनी गावाभोवती २५० मीटर सर्व गावांचा सर्व्हे करून देण्यात सहमती दाखवून त्याबाहेर असलेल्या घरांना कसे समाविष्ट करण्यात येईल याबाबत त्या सभेत अधिका-यांना सूचना दिल्या होत्या.पण त्या संबंधीचा जीआर कधी जनते पर्यंत आला नाही.या संदर्भात आ.महेश बालदी यांनी शासन दरबारी प्रयत्न केल्याचे समजले नाही किंवा त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मिटिंगमध्ये मत मांडले नाही.
विधानसभेत अनेक प्रश्न येत असतात आणि ते पूर्ण होतात.
असा आपला गोड समज आहे.जीआर निघणं ही विश्वास प्राप्त बाब पण त्याच काय झालं याचं उत्तर त्यांच्याकडे नाही.आत्ता त्यांनी गावाभोवती ५०० मीटर ची मागणी केली आहे, योग्य आहे.पण जीआर काढण्यासाठी पाठपुरावा किती राहणार ? या पुढच्या २ महिन्यात जीआर आणून गावकऱ्यांना दिल्यास आ.महेश बालदी किती खरे,किती खोटे हे जनतेला समजतील.
कारण,आजपर्यंत त्यांनी उरणचे उचललेले प्रश्न शोधून काढावे लागतील एक उरणात धुतूम,नवघर,बोकडविरा,कोट या चार गावांच्या रेल्वे स्टेशनच्या नावा विषयी विषय आ.बालदी यांनी प्रश्न हाती घेतला होता, दिल्लीला मोठा लवाजमा घेऊन गेले होते,त्यांचे सरकार असल्याने काम सहज होईल असे वाटले होते पण १०/११ महिने उलटले तरी ते साधे काम झाले नाही.( नवघर,धुतूम शेमटीखार, ही नावे आम्ही आणली,मात्र स्टेशनवर फलक लावले नाहीत.)
आता गावठाण वाढीचे जीआर आणि रेल्वे स्टेशनांची फलकासह नावे आणून ही दोन कामे दोंन महिन्यांत पूर्ण केल्यास मी आ.बालदी,हे किती खरे किती खोटे ? हे जाहीरपणे पटवून देऊन अभिनंदन करीन.
0 Response to "आ.महेश बालदी किती खरे किती खोटे ? रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील"
टिप्पणी पोस्ट करा