मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सामाजिक वेदना कवींनी राजकारण्यांना न घाबरता बिनधास्त मांडाव्यात..साहित्यरत्न प्रा. एल.बी.पाटील.

सामाजिक वेदना कवींनी राजकारण्यांना न घाबरता बिनधास्त मांडाव्यात..साहित्यरत्न प्रा. एल.बी.पाटील.

 


उरण प्रतिनिधी/ एम.डी.भोईर

           कवींनी संवेदनशील रहावे.सामाजिक वेदनांना आपल्या रचनांमध्ये न्याय द्यावा.पतीच्या मृत्यूनंतर पत्नीच्या 

अंगावरचे सौभाग्यालंकार उतरवू नयेत.तरुणाईला दारूमटनाची मांडव प्रथा बंद करण्यासाठी सामाजिक वेदना म्हणून आवाज उठवावा असे विचार साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील यांनी एन.जे. पाटील यांच्या " संवेदनशील चांदण्या " या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या समारंभात विचार मांडून कवी एन.जे.पाटील यांनी पुस्तकात मांडलेल्या सामाजिक वेदनांचा उल्लेख केला.अतिथी पत्रकार सूर्यकांत पाटील यांनी 

आगरी समाजाच्या समस्यांना तीव्रतेने मांडण्याचे कवींना आवाहन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त पी.डी.

पाटील होते.यावेळी तायडे डी आर.,शिरिष पाटील,म.वा.म्हात्रे,

चंद्रकांत पाटील, मच्छिंद्र म्हात्रे,स्मिता वाजेकर,लवेंद्र मोकल यांची प्रमुख उपस्थिती  होती.प्रास्ताविक एस.एस.पाटील यांनी केले.गांधी वाचनालय ,पेण

येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

      कवी एन.जे.पाटील यांनी आपल्या मनोगतात पुस्तक निर्मिती आणि साहित्य लेखन 

करण्याची पार्श्वभूमीवर सांगितली.नम्रता वर्तक यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.

0 Response to "सामाजिक वेदना कवींनी राजकारण्यांना न घाबरता बिनधास्त मांडाव्यात..साहित्यरत्न प्रा. एल.बी.पाटील."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...