
तटकरेंवर केलेली टीका कार्यकर्त्यांच्या जिव्हारी, शरद पवार नव्हे तर शरद पवारांचा शिलेदार राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांचा खास.तटकरेंच्या कार्यकर्त्यानी घेतला धसका...!
अलिबाग प्रतिनिधी :
तरी याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष शादाब गैबी आणि अंकित साखरे यांनी प्रति उत्तरादरम्यान तुमच जेवढ वय नाही तितकी तटकरे साहेबांची राजकीय कारकीर्द आहे. तर तुमची उंची किती तुजी पात्रता काय ? अशा पद्धतीचे प्रतिउत्तर मेहबूब शेख यांना देण्यात आले असल्याचे दिसून येते. मात्र खास. तटकरे यांनी ७० हजार कोटींचे काय केले? याबाबत देखील युवक कार्यकर्त्यांनी खुलासा करावा. असा मजेशीर सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून केला जात आहे. तर एका एकी भाजप सोबत जाण्याचा निर्णय का घेतला याचं कारणही अजित पवार गटाच्या युवक कार्यकर्त्यांनी द्याव. तर गुरुसमान असणार्या मा. मुख्यमंत्री अंतुले साहेब यांच्या पाठीत खंजीर खुपसला अशा यांसारखी टीका तटकरेंवर का होते, तर ज्यांनी राजकारणात मोठ मोठ्या संधी दिल्या पद दिली त्या पवार साहेबाना सोडून सत्तेच्या हव्यासापोटी विरुद्ध विचारधारा का स्वीकारली असे एक ना अनेक प्रश्न उभे राहत असताना, इतर ठिकाणी कोण काय बोलतोय हे बघण्यापेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाच्या कार्यकर्त्यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा कार्यध्यक्ष आमिर खानजादा यांनी व्यक्त केले.
0 Response to "तटकरेंवर केलेली टीका कार्यकर्त्यांच्या जिव्हारी, शरद पवार नव्हे तर शरद पवारांचा शिलेदार राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांचा खास.तटकरेंच्या कार्यकर्त्यानी घेतला धसका...!"
टिप्पणी पोस्ट करा