मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

राष्ट्रवादी काँगेस पक्ष (अजित पवार) गटाच्या कार्यकर्त्यांनी कोण काय बोलतोय हे बघण्यापेक्षा आपले नेते आज इथे तर उद्या कुठे ? याचा विचार करावा...    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हसळा तालुका कार्याध्यक्ष अझहर धनसे यांचा अजित पवार गटातील कार्यकर्त्यांना सल्ला..!

राष्ट्रवादी काँगेस पक्ष (अजित पवार) गटाच्या कार्यकर्त्यांनी कोण काय बोलतोय हे बघण्यापेक्षा आपले नेते आज इथे तर उद्या कुठे ? याचा विचार करावा... राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हसळा तालुका कार्याध्यक्ष अझहर धनसे यांचा अजित पवार गटातील कार्यकर्त्यांना सल्ला..!


म्हसळा प्रतिनिधी :
 राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी खास. तटकरे यांच्यावर आणि तटकरे कुटुंबियांवर टीका केली असता तटकरे कुटुंबियांचे कार्यकर्ते मेहबूब शेख यांना प्रति उत्तर देत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष शादाब गैबी आणि अंकित साखरे यांनी मेहबूब शेख यांना तुमच जेवढ वय नाही तितकी तटकरे साहेबांची राजकीय कारकीर्द आहे. तर तुमची उंची किती तुजी पात्रता काय ? अशा पद्धतीचे प्रतिउत्तर मेहबूब शेख यांना देण्यात आले असल्याचे दिसून येते. मात्र राजकीय कारकीर्द कितीही मोठी असली तरी आपल्या गुरूंच्या पाठीत खंजीर खुपसणे हे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात तटकरे साहेबांमुळे शिकायला मिळालं, महाराष्टाला एक वेगळ्याच पद्धतीची आणि सगळ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास करण्याची परंपरा होती.

     एक चांगली अशी प्रतिमा महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि राजकीय मंडळीची होती, मात्र सध्या या गटातटाच्या राजकारणामुळे तसेच राजकीय नेत्यांच्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी अनेक गट निर्माण झाल्याने महाराष्ट्राची हि प्रतिमा मलीन होत असल्याचे चित्र दिसून येते. तर तटकरे कुटुंबियांच्या या युवक कार्यकर्त्यांनी इतरांना उत्तर देत बसण्यापेक्षा पक्षाची महत्वाची जबाबदारी असताना देखील मूळ पक्षात फुट पाडून सत्तेमध्ये सामील झालेले आपले नेते आज इथे तर उद्या कुठे ? याचा विचार करावा.  अझहर धनसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हसळा तालुका कार्याध्यक्ष यांचा अजित पवार गटातील कार्यकर्त्यांना सल्ला.

0 Response to "राष्ट्रवादी काँगेस पक्ष (अजित पवार) गटाच्या कार्यकर्त्यांनी कोण काय बोलतोय हे बघण्यापेक्षा आपले नेते आज इथे तर उद्या कुठे ? याचा विचार करावा... राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हसळा तालुका कार्याध्यक्ष अझहर धनसे यांचा अजित पवार गटातील कार्यकर्त्यांना सल्ला..!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...