
जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा..!
सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३
Comment
विशेष प्रतिनिधी : असिफ खान : जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नथुराम केंद्रे यांच्या हस्ते संविधान निर्माते विश्वरत्न प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. चिमुकल्या विद्यार्थ्यानीच सूत्रसंचालनापासुन तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडली. सायना अनिल पोटले, आर्या किरण शिंदे या विद्यार्थीनींनीं भाषणाच्या माध्यमातुन कार्यक्रमात रंगत आणली. तर नैतिक नथुराम केंद्रे, जय संतोष पाखड, पार्थ सचिन काप या विद्यार्थ्यांनी वेशभूषेतुन कार्यक्रमाची शोभा वाढविली. आयशा किरण शिंदे या चिमुकल्या विद्यार्थीनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक श्री. शिंदे बाबा, श्री. संतोष पाखड तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती कार्यकारणी, हितचिंतक ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अखिल खैरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.
0 Response to "जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा..! "
टिप्पणी पोस्ट करा