मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीवर्धन मतदार संघाला अनेक मंत्रिपदे मिळाली परंतु श्रीवर्धन पोलीस स्थानकाच्या इमारतीची झालेली दुरावस्था कोणीच बघितली नाही.     माजी आमदार पंडित शेठ पाटील..

श्रीवर्धन मतदार संघाला अनेक मंत्रिपदे मिळाली परंतु श्रीवर्धन पोलीस स्थानकाच्या इमारतीची झालेली दुरावस्था कोणीच बघितली नाही. माजी आमदार पंडित शेठ पाटील..


श्रीवर्धन प्रतिनिधी : श्रीवर्धन शहरातील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवीन जागेत  स्थलांतर करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.यावेळी पोलीस यंत्रणेकडून करण्यात आलेल्या सहकार्या बद्दल स्वतः उपस्थित राहून उप विभागीय पोलीस अधिकारी. पोलीस निरीक्षक तसेच कर्मचारी यांचे आभार मानले.यावेळी श्रीवर्धन पोलीस स्टेशन इमारत. तसेच कर्मचारी वसाहत खोल्यांची दुरवस्था पाहून खंत व्यक्त केली.यावेळ बोलत असताना मागील अनेक वर्ष प्रलंबित असलेली श्रीवर्धन पोलीस ठाण्याची इमारत श्रीवर्धन तालुक्यात  अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असताना मात्र दुर्लक्षित आहे. श्रीवर्धन मतदार संघ हा बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचा मतदारसंघ असुन. मतदार संघाला अनेक मंत्री पदे  मिळाली आहेत.परंतु श्रीवर्धन पोलीस स्थानकाच्या इमारतीची झालेली दुरावस्था कुणाला दिसून आलेली नाही. मी आज आश्वासन देतो की श्रीवर्धन येथील पोलीस स्थानकाची सुसज्ज इमारत आमच्या माध्यमातून.दिली जाईल असे आश्वासन शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडीतशेट पाटील यांनी दिले. 

शेकाप नेते भाई जयंत पाटील यांच्या माध्यमातून इमारती साठी निधी मंजूर करावा यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असेल. श्रीवर्धन तालूका समुद्र किनारी असुन  या परिसरात अतिरेकी घातक कारवायां साठी समुद्र किनार्‍याचा वापर करू शकतात.येथील वसाहतीत कर्मचारी राहतात पण त्यांना योग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत.वसाहत काही प्रमाणात नादुरुस्त आहेत .श्रीवर्धन मध्ये पोलीस कर्मचाऱ्याला भाड्याची खोली घेणे हाच पर्याय असतो. 

याबाबत भाई जयंत पाटील यांना पोलीस स्टेशन विषयी झालेल्या दुरावस्थे बाबतीत फोन वरून  कल्पना दिली. तसेच श्रीवर्धन तालुक्यातील लोकांच्या सुरक्षेतीतेच्या बाबतीत जे ठिकाण महत्वाचे आहे त्याचीच अवस्था बिकट आहे.लवकरात लवकर ही अडचण दूर करण्यासाठी आम्ही आमच्या माध्यमातून प्रयत्न करणार.असुन श्रीवर्धन पोलीस ठाण्यासाठी चांगल्या प्रकारचे सुसज्ज कार्यालय असणे  काळाची गरज आहे असे पंडीतशेठ पाटील सांगितले यावेळी श्रीवर्धन तालुका सरचिटणीस वसंत यादव,विभागीय चिटणीस दिपक कांबळे,अनंत चव्हाण,मिथुन मुनेकर,मुज्जमील तोलकर,बाबू करंबत उपस्थित होते.

0 Response to "श्रीवर्धन मतदार संघाला अनेक मंत्रिपदे मिळाली परंतु श्रीवर्धन पोलीस स्थानकाच्या इमारतीची झालेली दुरावस्था कोणीच बघितली नाही. माजी आमदार पंडित शेठ पाटील.."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...