
राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित सन्मान नवदुर्गांचा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार.!
शनिवार, २१ ऑक्टोबर, २०२३
Comment
प्रतिनिधी रामचंद्र घोडमोडे श्रीवर्धन :- रायगड. रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित सन्मान नवदुर्गांचा कार्यक्रम जिल्ह्या आयोजित करण्यात आला होता. यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावांमधील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला रणांगिनींचे नवरात्र उत्सवा निमित्ताने नवंदुर्गा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. काम करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये चांगले काम तसेच समाज कार्य,घडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. सन्मानपत्र वाटपाचा कार्यक्रम दिघी कोळीवाडा येथील आंबे मातेच्या दरबारा मध्ये संपन्न झाला.यामध्ये
सौ. श्रृती राजकुमार कोलथरकर. ( ब्युटी पार्लर )सौ. हौसा चंद्रकांत निगुडकर (आशा सेविका) कु. तेजल चंद्रमणी मोरे. (नृत्य कलाकार) आभिलाशा रामचंद्र कांदेकर (क्रीडा संकलन)सौ. कल्याणी पाटील ( केन्द्र चालिका) यांचा समावेश आहे
नवंदुर्गा चें सन्मान पत्र वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सौ. कल्पणा संदेश कदम,अनंत पाटील,अदींच्या प्रमुख उपस्थिती मध्ये देण्यात आले.
0 Response to "राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित सन्मान नवदुर्गांचा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार.!"
टिप्पणी पोस्ट करा