मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बॉक्साईट उत्खनना संदर्भात मांदिवली गावात जनसुनावणी  मंदिवली गावात बॉक्साईट उत्खननाला परवानगी मिळणार  ?

बॉक्साईट उत्खनना संदर्भात मांदिवली गावात जनसुनावणी मंदिवली गावात बॉक्साईट उत्खननाला परवानगी मिळणार ?


विशेष प्रतिनिधी : मुझममिल जैतापकर :-  शासनस्तरावरून मांदिवली येथे बॉक्साईट उत्खनन सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून, 18 ऑक्टोबर  रोजी  होणाऱ्या जनसुनावणीनंतर बॉक्साईट कंपनीच्या उत्खननाचा मार्ग मोकळा होणार  का पहावे लागणार आहे. मात्र सध्या तरी मायनिंगला जोरदार विरोध होण्याची शक्यता धूसर बनली आहे

  मांदिवली  गावच्या आजूबाजूच्या डोंगरातील सुमारे साडेतीनशे एकर जमिनीत बॉक्साइट उत्खनन होण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत 120 एकर जमिनीची शासनाकडून रीतसर लिज मिळाली आहे . तसेच उर्वरित जमीन लीज मिळवण्याची कागद पत्र पूर्तता पूर्ण झाली आहे. मात्र प्रस्तावित मायनिंग शेजारी असणाऱ्या बाईत वाडी व सावंतवाडी या दोन वाड्यां मायनिंग खाण क्षेत्रापासून जवळ असल्याने या दोन्ही वाड्यांचा धोका लक्षात घेता  मायनिंग कंपनीला विरोध होऊ शकतो . परंतु दुसरीकडे पंचक्रोशीतील तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी अनेकांनी मायनिंगचे उघड उघड समर्थन केले आहे, तसेच या परिसरात मायनिंग सुरू झाल्यास स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळेल व विकास कामाला गती मिळेल,गावाचा विकास होईल अशी भावना काही लोकांची आहे. सध्या कोणत्याही प्रकारचा उद्योग धंदा या परिसरात नसल्याने शेकडो तरुण बेकार झाले आहेत, रिकाम्या हाताने फिरत असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे या पंचक्रोशीत एखादी उद्योग धंदा यायलाच हवा अशी मागणी करत काही लोकांनी मायनिंगचे खुलेआम समर्थन केले आहे

दापोली तालुक्यातील मांदिवली गावाच्या महसुली हद्दीत १३९.०५ क्षेत्र हे बॉक्साईट खनिज उत्खनन करण्यासाठी म्हणून शासनाकडून खनिज पट्टा मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर खनिज पट्ट्यातील महसुली क्षेत्रात मे हनिफा हरुण फजलानी यांचेकडून बॉक्साइट खनिज उत्खन केले जाणार आहे. उत्खनन करण्यासाठीची क्षमता वार्षिक ०.२६ दशलक्ष टन त्याचप्रमाणे २०० टन प्रति ताशी खनिज माल फोडण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार प्रदूषण मंडळाकडून याबाबतची जाहीर जनसुनावणी १८ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. ही जनसुनावणी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महाव्यवस्थापक जिल्हा उदयोग केंद्र, जिल्हा खनिकर्म अधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी अधिकान्यांच्या उपस्थितीत मांदिवली येथे घेण्यात येणार आहे.

   

  बॉक्साईट उत्खनाने जर मांदिवली येथील नैसर्गिक साधनसमृद्धीला धोका  निर्माण होऊन बॉक्साईट उखनाचे दुष्परिणाम गावाला वर्षोनुवर्ष भोगावे लागणार असतील तर या उत्खननाला आमचा विरोधच राहील. गावाच्या हितासाठी जे जे म्हणून करावे लागेल ते ते करण्यात येईल असे  काही ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत, 

मांदिवली पंचक्रोशीत प्रस्तावित असलेली मायनींग पंचक्रोशीच्या विकासाचा माईल स्टोन ठरणार आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक लोकांच्या हाताला रोजगार मिळेल, त्यामुळे गावांचा विकास होईल गेल्या अनेक वर्ष ओसाड  पडलेल्या खडकाळ माळ रानावर मायणींग सारखा प्रकल्प उभा राहिल्यास अनेक स्थानकांना रोजगार मिळेल. अनेक तरुण आखाती देशांमध्ये रोजगाराच्या शोधामध्ये गेले आहेत तसेच काही तरुण पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये रोजगाराची संधी शोधत वास्तव्यास केले आहेत परंतु या भागात एखादी प्रकल्प आल्यास स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळेल आणि ओस पडत असलेली गावे पुन्हा विकासाच्या प्रवाहात येतील . त्यासाठी पंचक्रोशीत युगातल्या प्रकल्पाचे स्वागत केले जात आहे.

जन सुनावणी पूर्वीच या गावात  कंपनी समर्थक व  विरोधक एकमेकांच्या विरोधात असल्याचे पाहायला मिळत आहे.

0 Response to "बॉक्साईट उत्खनना संदर्भात मांदिवली गावात जनसुनावणी मंदिवली गावात बॉक्साईट उत्खननाला परवानगी मिळणार ?"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...