मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा पाणी पुरवठा विभागाकडून एक महिना उलटून देखील ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल का होत नाही.? नेमका वरदहस्त कुणाचा..?  प्रशासकीय अधिकार्यांच्या मनमर्जी कारभारामुळे होत आहे सर्वसामान्यांच्या हक्कांची पायमल्ली...

म्हसळा पाणी पुरवठा विभागाकडून एक महिना उलटून देखील ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल का होत नाही.? नेमका वरदहस्त कुणाचा..? प्रशासकीय अधिकार्यांच्या मनमर्जी कारभारामुळे होत आहे सर्वसामान्यांच्या हक्कांची पायमल्ली...


विशेष प्रतिनिधी : म्हसळा :

   म्हसळा तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून ठेकेदारांचा प्रशासकीय यंत्रणेला न जुमानता मनमर्जी कारभार सुरू असल्याचे दिसून येते. असाच काहीसा प्रकार संदेरी येथे सुरू आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,

     संदेरी येथील धरणातून जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर संदेरी येथील धरणा शेजारी विहीर खोदण्याचे काम सुरू होते. मात्र संदेरी येथील धरणाशेजारी विहीर खोदत असताना ठेकेदार श्री.मजहर देशमुख आणि अवैध रित्या नेमण्यात आलेले उप ठेकेदार यांनी दोघांनी संगनमताने धरण शेजारील प्रतिबंधित असणाऱ्या क्षेत्रात अनधिकृत रित्या विस्फोट घडवून आणले. तसेच या प्रकरणी संदेरी येथील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी ही बाब सदरील पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तसेच म्हसळा तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिली अनेक वेळा पत्रव्यवहार केले मात्र तरी देखील शासकीय अधिकारी यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. अखेर जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्याकडे तक्रार करण्यात आली त्यानंतर दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी या प्रकरणी तहसीलदार श्री.समीर घारे, म्हसळा यांनी उप अभियंता ग्रामीण पाणीपुरठा यांच्याकडे पत्रव्यवहार करत या प्रकरणी ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश दिले असून पाणीपुरवठा विभागा कडून आज जवळ जवळ एक महिना उलटून गेला तरी सदरचे ठेकेदार मजहर देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही ? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रसाद विचारे यांनी प्रशासनाला विचारला असल्याचे दिसून येते. 

तसेच शासकीय अधिकारी आपल्या मनमर्जी कारभाराने प्रशासन चालवीत असताना आमच्या सर्वसामान्यांच्या हक्कांची पायमल्ली करीत आहेत. आणि जर का एखादा सर्वसामान्य नागरिक यांच्याकडे एखाद्या प्रकरणात पाठपुरावा करीत असल्यास त्याला शासकीय कामात अडथळा आणत असल्याचे कारण देत चुकीच्या पद्धतीने कलम ३५३ अंतर्गत कारवाई करून समाज्यामध्ये भीतीचा वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न म्हसळा तालुक्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असल्याचे दिसून येते.

तर संदेरी येथे  करण्यात आलेल्या विस्फोटकामध्ये वापरण्यात आलेले स्फोटक पदार्थ नेमके आले कुठून आणि अवैध रीतीने विस्फोटकांचा वापर करणाऱ्या कंत्राटदारांवर शासनाकडून कोणत्याही पद्धतीची कारवाई का केली जात नाही. या मागे नेमक कोण आहे? त्या कंत्राटदारांवर कुणाचा वरदहस्त आहे?. जर का शासनाने कंत्राटदारावर लवकरात लवकर गुन्हा दाखल केला नाही तर  म्हसळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल. याची दक्षता प्रशासनाने घ्यावी असा आवाहन ही यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रसाद विचारे यांनी केले असल्याचे दिसून येते.

0 Response to "म्हसळा पाणी पुरवठा विभागाकडून एक महिना उलटून देखील ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल का होत नाही.? नेमका वरदहस्त कुणाचा..? प्रशासकीय अधिकार्यांच्या मनमर्जी कारभारामुळे होत आहे सर्वसामान्यांच्या हक्कांची पायमल्ली..."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...