मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवरात्रौत्सवानिमित्त ग्रामविकास जनसेवा मंडळाचा ग्रामस्वच्छता अभियान...

नवरात्रौत्सवानिमित्त ग्रामविकास जनसेवा मंडळाचा ग्रामस्वच्छता अभियान...


म्हसळा विशेष प्रतिनिधी : 

        खारगावं खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळाचा ग्रामस्वच्छता अभियान सातत्याने सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. शासनाच्या स्वछता अभियानाला खऱ्या अर्थाने या मंडळाने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे दिसून येतो. दोन दिवसांनी सुरु होणार्या नवरात्रौत्सवाच औचित्य साधून दि.13/10/2023 रोजी गावदेवी मंदिर रस्ता आणि बस स्थानक यांची स्वच्छता करण्यात आली. तसेच मुख्य रस्त्याला लगत वाहनांना अडसर असणारी झाडे झुडपे स्वच्छ करण्यात आली शासनाने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत जसा आपण सर्व ग्रामस्थ सहभागी होतो त्याच प्रमाणे गावाची स्वच्छता करण्यासाठी जनसेवा मंडळ कार्यरत आहे त्यामध्ये गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला तर गाव चांगल्या प्रमाणात स्वच्छ राहील गावात साथीचे आजार पसरण्यास आळा बसेल या

मंडळाने पुढाकार घेऊन स्वच्छतेचे व्रत घेतले आहे त्यात नागरिकांनी सहभाग नोंदवावा आणि गाव स्वच्छ करण्यासाठी शासनाला आणि मंडळाला सहकार्य करावे आजच्या स्वच्छता मोहीम यशस्वी राबविण्यासाठी श्री महादेव पाटील,श्री चंद्रकांत कांबळे, श्री कृष्णा म्हात्रे, श्री विश्वास खोत, श्री मंगेश म्हात्रे, श्री वसंत म्हात्रे श्री योगेश मेंदडकर, श्री जयवंत खोत,श्री हरीश म्हात्रे आणि इतर ग्रामस्थ यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार...

0 Response to "नवरात्रौत्सवानिमित्त ग्रामविकास जनसेवा मंडळाचा ग्रामस्वच्छता अभियान..."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...