म्हसळा विशेष प्रतिनिधी : असिफ खान : म्हसळ्यात नेहमीच चर्चेचा ठरत असणारा विषय म्हणजे म्हसळा पोलिस ठाणे.. म्हसळा शहरात आणि तालुक्यात नेहमीच आपल्या डेशिंग पणामुळे चर्चेत असणारे म्हसळा पोलिस ठाण्याचे स.पो.नि. सोनावणे हे म्हसळ्यात आल्यापासून म्हसळा पोलिस ठाण्याचा कारभार हाती घेऊन जवळ जवळ ९ महिने झाले असून आजतागायत ते शासकीय विश्रामगृह म्हसळा येथे वास्तव्य करीत असल्याचे समजते. तरी याबाबत सा.बांध. कार्यालय श्रीवर्धन यांचेकडे याबाबत माहिती घेतली असता शासकीय विश्रामगृह येथे २ ते ४ दिवस शासकिय अधिकारी तथा लोकप्रतीनिधी हे वास्तव्य करू शकतात.मात्र म्हसळा तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था याचं पालन करणारे पोलिस विभागातील एका मुख्य अधिकार्यांना म्हसळा सारख्या सर्व सुखसोयी उपलब्ध असणाऱ्या शहरामध्ये राहण्यासाठी घर मिळत नसल्याने त्यांना शासकीय विश्रामगृह येथे एखाद्या अश्रीतासारख रहाव लागत आहे हि खूप मोठी दुर्दैवाची आणि विचारणीय बाब आहे. तरी म्हसळा शहरवासीय नक्कीच या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन म्हसळा पोलिस ठाण्याचे स.पो.नि. सोनावणे यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था करतील आणि कोकणातील पाहुणचार करतील असे मत कोकण २४ न्यूज यु ट्यूब/ पोर्टल च्यानेल चे मुख्य संपादक श्री.अझहर धनसे यांनी व्यक्त केले आहे.
आणि भविष्यात म्हसल्यातील कोणत्याही विभागातील मुख्य अधिकार्यांना अस आश्रीतासारख राहायची वेळ येणार नाही. याबाबतहि म्हसळा वासीय नक्कीच दक्षता घेतील.
0 Response to "म्हसळा पोलीस ठाण्याचे स.पो.नि.सोनावणे यांना म्हसळ्यात मिळेना राहायला घर..."
टिप्पणी पोस्ट करा