मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सकलप/खारगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीत पुन्हा एकदा ब्लास्टिंग.... प्रशासनाला निवेदन खूप झाली आता सकलप स्टाईल ने देणार उत्तर. ग्रामस्थांचं प्रशासनाला इशारा.

सकलप/खारगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीत पुन्हा एकदा ब्लास्टिंग.... प्रशासनाला निवेदन खूप झाली आता सकलप स्टाईल ने देणार उत्तर. ग्रामस्थांचं प्रशासनाला इशारा.


विशेष प्रतिनिधी - मुजाहिद धनसे  :- गेल्या ५ ते ६ वर्षांपासून माणगाव ते दिघी या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग ७५३ फ या रस्त्याचे काम सुरू असून  म्हसळा तालुक्यातील खरगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीतून हा रस्ता जात असून गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू असतानाच खरगाव खुर्द गावच्या हद्दीत जे.एम म्हात्रे कंपनीकडून वारंवार ब्लास्टिंग होत असल्याचे दिसून येते. याबाबत सप्टेंबर महिन्यात ब्लास्टिंग झाल्यानंतर त्या संदर्भात तहसिलदार म्हसळा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र आज दिनांक २१ जून २०२३ रोजी पुन्हा एकदा ११.३०-१२.१५ च्या दरम्यान कंपनीकडून ब्लास्टिंग करण्यात आले. झालेली ब्लास्टिंग हे एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की खरगाव खुर्द आणि सकलप ही दोन्ही गाव हादरली असून या ब्लास्टिंग मुळे दोन्ही गावच्या हद्दीतील अनेक घराना तडे गेले असल्याचे चित्र दिसून येते.याबाबत सदर ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी आता खूप निवेदने आणि पत्र व्यवहार झाले. मात्र प्रशासन झोपेचं सोंग पांघरून बसलेलं आहे अस वाटत.

     कारण तहसीलदार म्हसळा यांना निवेदन देऊन देखील जर का कंपनीकडून ब्लास्टिंग होत असेल तर याच नेमक कारण काय? आणि ब्लास्टिंग ची परवानगी नेमकी कुणी दिली असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत . तसेच ग्राम पंचायत समिती खारगाव खुर्द यांच्याकडे देखील याबाबत अनेक तक्रारी करून जर का? आम्हाला होणारा त्रास थांबत नसेल तर यापुढे आम्ही गावकरी आमच्या सकलप स्टाईल ने याच उत्तर देऊ. आणि सकलप स्टाईल काय आहे. हे म्हसळा तालुक्यातील अनेकांना माहीत आहेच आणि मग कंपनीला जे काही नुकसान होईल याची जबाबदारी कंपनीचे अधिकारी आणि प्रशासन यांची असेल. कारण आम्ही शांतपणे सांगून पात्र व्यवहार करून जर हे थांबत नसेल तर आता आमच्या कडे पर्याय नाही.... 

0 Response to "सकलप/खारगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीत पुन्हा एकदा ब्लास्टिंग.... प्रशासनाला निवेदन खूप झाली आता सकलप स्टाईल ने देणार उत्तर. ग्रामस्थांचं प्रशासनाला इशारा."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...