
कौशल्य विकास विभागामार्फत रविवारी... ऐरोलीमध्ये समुपदेशन शिबिराचे आयोजन
शनिवार, ३ जून, २०२३
Comment
ठाणे विशेष प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येत्या रविवारी, दि. 04 जून 2023 रोजी नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात करिअरच्या संधीविषयी माहिती देण्यात येणार आहे.ऐरोलीमधील श्री संत सावता भवन हॉल, प्लॉट नंबर 31, सेक्टर 5 येथे सकाळी ०9.०० ते १.०० या वेळेत हे शिबिर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिरामध्ये नवी मुंबई येथील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी उपस्थित राहून ऑनलाईन नोंदणी करावी. कार्यक्रमासाठी इयत्ता १० वी, १२ वी परिक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी नवी मुंबई येथील संबंधित शाळेतील, कॉलेज मधील प्राचार्य व शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे (वागळे) प्राचार्य स्मिता सुभाष माने यांनी केले आहे.
ठाणे विशेष प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येत्या रविवारी, दि. 04 जून 2023 रोजी नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात करिअरच्या संधीविषयी माहिती देण्यात येणार आहे.
0 Response to "कौशल्य विकास विभागामार्फत रविवारी... ऐरोलीमध्ये समुपदेशन शिबिराचे आयोजन"
टिप्पणी पोस्ट करा