
म्हसळ्यामध्ये “कुंपणच खातय शेत” न्यायासाठी जायचं तरी कुणाकडे सर्वसामान्यांचा प्रश्न ..? पोलीस सहा. निरीक्षक सोनावणे करीत आहेत फिर्यादिंवर दबाव तंत्राचा वापर...
रविवार, २१ मे, २०२३
Comment
म्हसळा - म्हसळा शहरासह तालुक्यात कायदा आणि
सुव्यवस्था सांभाळण्याच काम म्हसळा पोलीस विभाग करीत असलेले दिसून येत. यातच अनेक
ठिकाणी काही छोटी मोठी समस्या तर काही ठिकाणी हाणामारी ची देखील प्रकरणे होत
असलेली दिसून येतात. सगळीच प्रकरणे पोलिस दफ्तरी नोंद होत नाहीत. आणि काही प्रकरणे
नोंद झालीच तरीही त्यांची योग्य तपासणी करून गोर गरिबांना न्याय मिळणे तर खूप
दूरची बाब राहिली.
बर्याच वेळा पोलीस विभागांतर्गत
अनेक माध्यमांमधून सर्व सामन्यांच्या हितासाठी आणि सर्व सामन्यांच्या मनात पोलीस
विभागाबाबत असलेली भीती कमी व्हावी या दृष्टीने पोलीस प्रशासन वेगवेगळे उपक्रम
राबवीत असलेले देखील पहावयास मिळते. मात्र म्हसळा पोलीस ठाणे या गोष्टीला अपवाद
ठरत असलेले दिसून येते. याचाच प्रत्यय काही दिवसांपूर्वी पांगळोली येथील एका
प्रकरणी दिसून आला सोबतच म्हसळा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस नि.सोनावणे कशापद्धतीने
एखाद्या फिर्यादीवर दबाव तंत्राचा वापर करून एका गोर
गरीब फिर्यादीला काही विशिष्ट पक्षाच्या कार्याकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यापासून
रोखतात.हे पहावयास मिळाले. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलीस प्रशासनाकडून
न्याय मिळण्याची आशा धूसर होताना दिसून येते. आणि सोबतच म्हसळा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक सोनावणे
यांच्या अशा वागणुकीमुळे पोलीस विभागाच्या बद्दल चुकीचा संदेश समाजामध्ये जात
असल्याचे दिसून येते. तर याप्रकरणी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः जातीने लक्ष
देऊन दोषींवर कारवाई करणार का..? असा प्रश्न सर्वसामान्यांना
पडला आहे....
म्हसळा - म्हसळा शहरासह तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याच काम म्हसळा पोलीस विभाग करीत असलेले दिसून येत. यातच अनेक ठिकाणी काही छोटी मोठी समस्या तर काही ठिकाणी हाणामारी ची देखील प्रकरणे होत असलेली दिसून येतात. सगळीच प्रकरणे पोलिस दफ्तरी नोंद होत नाहीत. आणि काही प्रकरणे नोंद झालीच तरीही त्यांची योग्य तपासणी करून गोर गरिबांना न्याय मिळणे तर खूप दूरची बाब राहिली.
0 Response to "म्हसळ्यामध्ये “कुंपणच खातय शेत” न्यायासाठी जायचं तरी कुणाकडे सर्वसामान्यांचा प्रश्न ..? पोलीस सहा. निरीक्षक सोनावणे करीत आहेत फिर्यादिंवर दबाव तंत्राचा वापर..."
टिप्पणी पोस्ट करा