मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीवर्धन तालुका  कुणबी युवा प्रतिष्ठाण कडून आरोग्य महाशिबिराचे आयोजन, दोन हजाराची तपासणी मोफत, ३२२ पुरुष महिला यांनी घेतला शिबिरामध्ये भाग..

श्रीवर्धन तालुका कुणबी युवा प्रतिष्ठाण कडून आरोग्य महाशिबिराचे आयोजन, दोन हजाराची तपासणी मोफत, ३२२ पुरुष महिला यांनी घेतला शिबिरामध्ये भाग..


श्रीवर्धन सोपान निंबरे;  कै ग स कातकर कुणबी समाज मंदिर हॉल येथे कुणबी युवा प्रतिष्ठान श्रीवर्धन आणि बर्फे हॉस्पिटल माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने दि १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 
सदर शिबिराला MBBSMD डॉ. शैलेश बर्फे, उपजिल्हा रुग्णालय  माणगांव नेत्र चिकित्सक शंतून डोईफोडे, यशोदा पार्टीलिटी टेस्ट ट्यूब सेंटर डॉ साफिया माणगांव यांचे सहकार्य तसेच कार्यक्रमावेळी प्रमुख मान्यवर डॉ ढवळेजी, जेष्ठ काप गुरुजी, महादेव जाधव, सुनील खळे, प्रकाश जाधव, शंकर शिगवण, सीताराम साळवी, महेंद्र टाकले, कृष्णा मांडवकर, गोपाळ निवाते, बाळकृष्ण निवाते, सुरेश शिगवण, गजानन निंबरे, पत्रकार संदीप लाड, मेग्रे विभाग महिला अध्यक्ष रसिका अडगावले, महिला सेक्रेटरी  प्रियंका चाचले, सहसेक्रेटरी अमृता निंबरे यांची उपस्थिती होती. 
मोफत आरोग्य शिबिरात विविध आजारांवर तपासणी सेवा  उपलब्ध करण्यात आली तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण व सरासरी, रक्तदाब व ऑक्सिजन पातळी, नसांची तपासणी,नेत्र चिकित्सा इत्यादींचा समावेश होतो. त्याच प्रमाणे गरजू व ज्येष्ठ समाज बांधवांना नेत्र तपासून अल्प दरात चष्माचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात समाजबांधवांकडून मोठ्या संख्येने उपस्थित होती तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुणबी युवा प्रतिष्ठाणने मेहनत घेतली

0 Response to "श्रीवर्धन तालुका कुणबी युवा प्रतिष्ठाण कडून आरोग्य महाशिबिराचे आयोजन, दोन हजाराची तपासणी मोफत, ३२२ पुरुष महिला यांनी घेतला शिबिरामध्ये भाग.."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...