मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा तालुक्यातील पोलीस प्रशासन सुस्त..! अवजड वाहन धारक मात्र मस्त.

म्हसळा तालुक्यातील पोलीस प्रशासन सुस्त..! अवजड वाहन धारक मात्र मस्त.


विशेष प्रतिनिधी :- श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे विकसित होत असलेल्या अडाणी पोर्ट (दिघी पोर्ट) येथून रात्रीच्या  वेळी कोळशाची मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचे दिसून येते. याबाबत अनेक वेळा बातमी प्रकाशित करूनही आजतगायत मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरु असल्याचे दिसून येते. आणि श्रीवर्धन तालुक्यातून मोठ्या प्रमाणात बॉक्साइट ची वाहतूक होत असताना श्रीवर्धन पोलिस कर्मचारी, दिघी सागरी पोलीस तसेच म्हसळा पोलीस ठाण्याचे अधिकारी मात्र याकडे जाणुन बुजून दुर्लक्ष करित असल्याचे दिसून येते. एका सर्वसाधारण वाहन धारकांवर लायसन्स नसणे गाडीचे कागदपत्र सोबत नसणे नियमाचे उल्लंघन करण्याबाबत तात्काळ कारवाई करणारे हे पोलीस अधिकारी चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीला आला का नाही बसवत? कि या ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहणधारकांवर नेमका वरद हस्त कुणाचा? पोलीस प्रशासन ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई का नाही करत?असे एक न अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होताना दिसून येतात. तर एकीकडे या ओव्हरलोड वाहतुकीमुळे दुसऱ्या दिवशी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती तसेच धूळ पडलेली दिसून येते.  ज्याचा त्रास म्हसळा शहरासह  तालुक्यातून येणाऱ्या सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे.तरी या ओव्हर लोड वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांवर पोलिस प्रशासन कारवाई करणार का असा सवालही प्रत्येक म्हसळा वासिय विचारताना दिसत आहेत.

0 Response to "म्हसळा तालुक्यातील पोलीस प्रशासन सुस्त..! अवजड वाहन धारक मात्र मस्त."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...