मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसल्यात पुन्हा एकदा मटका जुगार जोमात,पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष...

म्हसल्यात पुन्हा एकदा मटका जुगार जोमात,पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष...


म्हसळा शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जुगार आणि मटका व्यवसाय जोमात सुरू होते,याबाबत कोंकण२४ न्युज ने अनेक वेळा बातमी प्रकाशित केल्यानंतर तसेच वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर म्हसळा तालुक्यातील म्हसळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस अधिकारी श्री.सुर्वे यांनी जुगार आणि मटका व्यवसाय यावर बंधन तसेच कडक कारवाई केल्यानंतर म्हसळा शहरातील या अड्ड्यांवर व्यवसाय बंद झाले होते,मात्र त्यानंतर लगेचच श्री.सुर्वे यांची बदली करण्यात आली.आणि नवीन अधिकारी सोनवणे यांची म्हसळा पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर काही दिवस बेकायदेशीर जुगार आणि मटका व्यवसाय यांवर लगाम होता.मात्र नव्याचे नऊ दिवस संपल्याने काही महिन्यांपासून पुन्हा एकदा या मटका आणि जुगार खेळाला रंग चढल्याचे दिसून येते.तर याकडे पोलिस अधिकारी श्री.सोनवणे साहेब तसेच पोलिस प्रश्नाचे पद्धतशीर रित्या दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. तर यावर पोलिस प्रशासनाकडून कारवाई होणार का? असा सवाल म्हसळा शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य जनता विचारताना दिसत आहेत.

0 Response to "म्हसल्यात पुन्हा एकदा मटका जुगार जोमात,पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष..."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...