मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा तालुक्यातील गहाळ झालेले सामाजिक वनीकरण चे कार्यालय सापडले..!  पोस्ट विभागाने अखेर शोध घेतलाच.

म्हसळा तालुक्यातील गहाळ झालेले सामाजिक वनीकरण चे कार्यालय सापडले..! पोस्ट विभागाने अखेर शोध घेतलाच.


विशेष प्रतिनिधी :- गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय पोस्ट विभाग आपले काम अगदी नित्य नेमाने आणि इमाने इतबारे करताना दिसते अगदी परंपरानुसार भारतातील शहरापासून ते खेड्यापर्यंत अगदी काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत विशाल काय असं जाल असणार हे विभाग नात्यांची गुंफण या विभागामार्फत केली जात असते. आणि म्हणूनच वैयक्तिक असो किंवा शासकीय पत्र व्यवहार हे मोठ्या प्रमाणात पोस्ट विभागांतर्गत केले जातात. आणि पोस्ट विभाग मोठ्या जोमाने काम करीत असताना म्हसळा तालुक्यातील एका पोस्टमन ने तर एका गहाळ असणाऱ्या कार्यालयाचा शोध घेण्याचे मोठे काम केल्याचे दिसून येते.
      याबाबत सविस्तर वृत्त असे कि कोकण २४ न्युज च्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी म्हसळा सामाजिक वणीकरण विभागाचे म्हसळा कन्याशाळा येथे असणारे कार्यालय गेल्या ३ महिन्यांपासून बंद असल्याबाबतचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. मात्र सदर कार्यालयाबाबत चौकशी केली असता सदर चे कार्यालय हे श्रीवर्धन येथे हलविण्यात आले असल्याचे दिसून आले. असे असताना म्हसळा तालुक्यात हे कार्यालय नाही याची खात्री झाल्यानंतर हे वृत्त प्रकाशित केले असताना. सामाजिक वनीकरण विभागाकडे काही साधारण माहितीकरिता पोस्टाद्वारे माहितीचा अधिकाराचा अर्ज पाठविला होता. म्हसळा तालुक्यात असणाऱ्या कार्यालयाच्या पत्त्यावर सदर अर्ज पाठविला असता हे पत्र या कार्यालयात पोच झाल्याचे पोस्ट कार्यालयाकडून पोच पावती सामाजिक कार्यकर्ते श्री. अझहर धनसे यांना प्राप्त झाली.


    मात्र या पत्त्यावर कार्यलय नसताना हे पत्र नेमक कुणी स्वीकारलं याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. श्रीवर्धन येथे कार्यालय निर्माण करून म्हसळा तालुक्यातुन कारभार चालवीत असणाऱ्या अधिकार्याबद्दल याबाबत सामाजिक वनीकरण च्या वरिष्ठ कार्यालय तथा वरिष्ठ अधिकारी यांकडे तक्रार तसेच पोस्ट विभागाच्या नियमानुसार सदर पत्त्यावर जर कुणी नसेल तर ते परत प्रेषक असणाऱ्याकडे पाठविण्यात येते. मात्र असे न होता, पोस्ट ऑफिस मधून सदरचे पत्र हे सामाजिक वनीकरण कार्यालयाला कसे काय मिळाले
      तर आम्ही एवढी चौकशी करून आम्हाला आणि म्हसळा तालुक्यातील सामान्य नागरिकांना न मिळालेले हे गहाळ झालेले कार्यालय पोस्टमन यांना कसं आणि कुठे सापडलं याबाबत ही प्रश्न चिन्ह? उपस्थित होत आहे. कि मग जनतेची दिशाभूल करणाऱ्या सामाजिक वनीकरण कार्यालयातील कर्मचारी यांनी म्हसळा तालुक्यातील सर्वच विभागाकडे हात मिलवणी केली कि काय अशी शंका निर्माण होत आहे.

    तर याबाबत लवकरच पोस्टाच्या या गलथान कारभाराबाबत पोस्ट विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते तथा कोकण २४ न्युज चे मुख्य संपादक श्री.अझहर धनसे यांनी व्यक्त केले.

0 Response to "म्हसळा तालुक्यातील गहाळ झालेले सामाजिक वनीकरण चे कार्यालय सापडले..! पोस्ट विभागाने अखेर शोध घेतलाच."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...