मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बॅ. अंतुले साहेब यांच्या जयंतीनिमित्त ग्रुपग्रामपंचायत चाणजे कार्यालयात अंतुले साहेब यांची तसबीरचे अनावरण.

बॅ. अंतुले साहेब यांच्या जयंतीनिमित्त ग्रुपग्रामपंचायत चाणजे कार्यालयात अंतुले साहेब यांची तसबीरचे अनावरण.


उरण प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे ) कोकणचे सुपुत्र,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅ.अं.र.अंतुले यांची 9 फेब्रुवारी 2023 रोजी जयंती उरण तालुक्यातील चाणजे ग्रुपग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त कार्यालयात त्यांची तसबीर लावण्यात आली आहे.कोकणचे सुपुत्र बॅ.अंतुले यांचे राजकारणात एक वेगळीच छाप होती,ते मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री असताना लोकाभिमुख व धडाकेबाज निर्णय घेऊन अनेक गोरगरीब जनतेसाठी विविध योजना लागू केले.अशा आदर्शवत  रायगडच्या सुपुत्राची तसबीर ग्रामपंचायत कार्यालयात लावावी अशी मागणी शिवसेनेचे नेते माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले ग्रुपग्रामपंचायत सदस्य  व्यंकटेश म्हात्रे यांनी विद्यमान सरपंच अमिताभ भगत यांच्याकडे सदर मागणी केली असता त्यांनी ताक्ताळ मंजुरी दिली. जयंतीनिमित्त चाणजे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात तसबीर लावण्यात आली.याप्रसंगी चाणजेचे सरपंच  अमिताभ भगत, उपसरपंच सोनाली ठाकूर, सदस्य व्यंकटेश म्हात्रे, रविंद्र कोळी, कॉंग्रेसचे मार्तंड नाखवा,उपविभागप्रमुख राजू पाटील, उपशाखाप्रमुख  विश्वनाथ पाटील,युवा नेते कल्पेश भोईर व इतर ग्रामस्थ तसेच कर्मचारी उपस्थित होते.अंतुले साहेबांची तसबीर ग्रामपंचायत कार्यालयात लावल्याबद्दल अंतुलेप्रेमी व कॉंग्रेसजनांनी समाधान व्यक्त केले व सरपंच व सदस्य यांचे आभार मानले.

0 Response to "बॅ. अंतुले साहेब यांच्या जयंतीनिमित्त ग्रुपग्रामपंचायत चाणजे कार्यालयात अंतुले साहेब यांची तसबीरचे अनावरण."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...