
रोहा पंचायत समीतीचा आजब कारभार, रोहा पोलीसांकडून तपासाची माहिती आसताना बिडिओ करुन भ्रष्टचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न...
सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३
Comment
रोहा:(शहानवाज मुकादम) तालुका पंचायत समिती च्या शेषफंडाच्या निधी वाटपात झालेल्या अनियमता व भ्रष्टाचार उघड करुन देखील फौजदारीस पात्र असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करुन देखील कारवाई होतांना दिसत नाही.तक्रारीचे स्वरूप सन २०२१ ते आज पर्यंत केलेल्या तक्रारीच्या पाठपुरावा पहाता रोहा पंचायत समिती शेषफंड अंतर्गत बिरवाडी कब्रस्तान मध्ये मुरुम टाकणे चे काम न करताच बिल लाटली आसल्याचे माहिती अधिकार अर्जातून उघड झाली आहे. हा शेषफंड रक्कम ८०,हजार मात्र काम दोन ठिकाणी दाखवून, अधिकारी कामात स्पष्ट दिशाभूल करीत असल्याचे कागदोपत्री उघड होतांना दिसत आहे.सदर चे काम एकदा खैरे खुर्द कब्रस्तान येथे मुरुम टाकणे चे खर्च दाखवीत आहे तर नंतर बिरवाडी ते खैरे खुर्द कब्रस्तान पर्यंत मुरुम टाकण्यात आल्याचे दाखले असे असता ग्रामपंचायतीच्या रेकाॅटला मात्र माहिती अधिकारात माहिती घेतली असता हे काम झालेच नाही अशा निकषाची माहिती उपलब्ध झाली आहे.यावरुन संबंधित अधिकारी, ठेकेदार व या निधीचे अफाहर ज्याच्या ज्याच्या संगमताने झाली आहे अशांवर वरीष्ठांनी कारवाई करावी असे गेली वर्षेभर करत असलेल्या मागणीला तीळांजळी देण्याचे गौडबंगाल सद्या अधिकारी वर्गातून होतांना दिसत असल्याने मा.पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांच्याकडे केलेला तक्रार अर्ज रोहा पोलीस स्टेशन येथे चौकशीला आला आसुन सदर अर्जा चा तपास पोलीस हवालदार श्री गदमळे यांच्याकडे आसुन शासनाच्या निधीचा अफाहार होऊन चोरी केल्याचे उघड झाल्याने राज्य कारभार नियमावली १९७५कलम६/१४,फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३कलम ३९/१९७, महाराष्ट्र व्हिसल ब्लोअर कायदा २०१४कलम ११ते १६ईन्फरमेशन टेक्नॉलॉजी कायदा २०००कलम ६५ते ६७ नुसार फौजदारी गुन्हा दाखल व्हावा.राज्य सरकारच्या आदेशांना केराची टोपली दाखवून उप अभियंता, ठेकेदार, ग्रामसेवक,व सरपंच, सदस्य, अशांपैकी कोणी दोषी असतील असे ज्यांनी बनावट अभिलेख तयार करुन ते खरे असल्याचे भासवून शेषफंड हडप करून जनतेची व शासनाची दिशाभूल करत आहेत.तरी त्यांच्या वर साधं एफ आय आर सुद्धा केला नाही.हे सगळा प्रकार स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दबावाखाली होत असल्याचे दिसुन येत आहे. कारण या विषयी संबंधित सरपंच, ग्रामसेवक,ठेकेदार,अभियंता,व ग्रामपंचायत खांबेरे च्या सदस्यांचे साक्षीदार व तक्रारदार यांचे जबाब टंकलिखित नोंदवून घेण्यात आले असून सदर कामा संबंधित सर्व कागदोपत्रांचा जवळपास तपास पुर्ण झाला आसुन सदर च्या कामाचे नावात बदल आसुन कामाचे फोटो ही इडीट केलेचे सिद्ध झाले आहे,सदर चे ठेकेदार यांचे जवळचे संबंध आसलेणे व संबंधित यांना वाचवीने कामी मदत केलेचे समजते, तरी या संदर्भात पोलीस अधिक्षक रायगड अलिबाग यांच्या कडे केलेल्या तक्रारीचा परिणाम होतांना दिसत नाही उलट दि:03/10/2022,रोजीसुरु आसलेला तपास आरध्यात थांबवून मी केलेला तक्रारी अर्ज दप्तरी फाईल केलेचे तपासी अंमलदार श्री गदमळे यांनी कळविले आसुन सदर च्या तपासातील सर्व कागदपत्रा सह मा.गटविकास अधिकारी रोहा यांना सदर विषयी पुढील कारवाई होणे बाबत दोन वेळा रोहा पोलीसांकडून पत्र पाठविण्यात आले आसुन बिडिओ रोहा करुन कोनतीही दखल घेउन कारवाई होताना दिसत नाही. उलट खोटे २५ साक्षिदार तयार करुन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी राजिप यांना काम झालेचे दाखवून मा.पोलीस निरीक्षक रोहा व तक्रारदार यांना दिशाभूल करणारे पत्र पाठविण्यात आले आहे.सदर विषयी भ्रष्टाचार चे सर्व पुरावे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी राजिप अलिबाग यांना सादर करुन ही तक्रारीची दखल घेताना दिसुन येत नाही. सदर विषयी रायगड जिल्हा परिषद अलिबाग व पंचायत समिती रोहा यांनी सबंधित भ्रष्टाचाराविरुद्ध जाणुन बुजून कारवाई होत नसल्याने मा.जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्याकडून भ्रष्टाचाराविरुद्ध एफआयआर दाखल होणे कामी रोहा पोलीस ठाण्यात आदेश होणेस विनंती अर्ज सादर. भ्रष्टाचाराविरुद्ध एफआयआर दाखल न झाल्यास मा.जिल्हाधिकारी कार्यालया समोर पुन्हा उपोषणास बसणार आसल्याचा शहानवाज मुकादम यांनी ईशारा दिला आहे.
रोहा:(शहानवाज मुकादम) तालुका पंचायत समिती च्या शेषफंडाच्या निधी वाटपात झालेल्या अनियमता व भ्रष्टाचार उघड करुन देखील फौजदारीस पात्र असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करुन देखील कारवाई होतांना दिसत नाही.
0 Response to "रोहा पंचायत समीतीचा आजब कारभार, रोहा पोलीसांकडून तपासाची माहिती आसताना बिडिओ करुन भ्रष्टचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न..."
टिप्पणी पोस्ट करा