मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

उलवे नोड मध्ये लोकनेते दि.बा पाटील यांची जयंती साजरी!

उलवे नोड मध्ये लोकनेते दि.बा पाटील यांची जयंती साजरी!


उरण (विठ्ठल ममताबादे )- स्वर्गीय लोकनेते दि बा. पाटील यांच्या  संकल्पनेतील संघटना सिडको प्रकल्पग्रस्त हक्क प्रस्थापित समिती उलवे मध्ये सिडको प्रकल्पग्रस्त नेते कृष्णा पाटील यांच्या अध्यक्ष खाली कार्यरत आहे. दि बा पाटील यांच्या शेवटच्या पर्वात त्यांनी काही काळ त्यांच्यासोबत काम केले. यावेळी  दि.बां च्या संकल्पनेतून ही संघटनेचां जन्म झाला. परंतु ती व्यापक स्वरूपात ‌ अस्तित्वात आली नाही. म्हणून ही संघटना उलवे शहरात कार्यरत आहे.स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून संघटनेच्या वतीने अभिवादन  करण्यात आले. या वेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम उलवे शहरातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या ‌ जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला. यावेळी बाळासाहेब यांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "उलवे नोड मध्ये लोकनेते दि.बा पाटील यांची जयंती साजरी!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...