मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय हरवले..!

म्हसळा सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय हरवले..!


म्हसळा प्रतिनिधी :- म्हसळा शहरातील कन्या शाळा येथे सामाजिक वनीकरण विभाग म्हसळा चे कार्यालय गेल्या अनेक महिन्यांपसून कार्यरत होते.मात्र गेल्या काही महिन्यांपसून सदरचे कार्यालय बंद स्थितीत असून कार्यालय नेमके कुठे गेले या बाबत काहीच थांगपत्ता नव्हता. काही दिवसांपूर्वी मिळालेल्या माहितीनुसार सदरचे कार्यालय श्रीवर्धन येथील एका इमारतीत हलविले असल्याचे समजले. या बाबत सविस्तर माहिती घेता.सदरचे कार्यालय श्रीवर्धन येथे कुणाच्या आदेशाने,परवानगीने हलविण्यात आले. याबाबत माहिती देण्यास कार्यालयातील कर्मचारी यांनी नकार दर्शविला, तरी सदरची बाब ही म्हसळा सामाजिक वनीकरण विभाग तसेच म्हसळा प्रशासना बाबत कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे,तसेच कुणाच्या ही तसेच वरिष्ठ अधिकारी तथा कार्यालय यांच्या परवानगी शिवाय असंविधानिक पद्धतीने अधिकाऱ्यांच्या मनमर्जी नुसार कार्यालय स्थलांतर करणे ही खेद जनक बाब आहे. तर या कार्यालयाचा संपूर्ण म्हसळा तालुक्यात शोध घेतला असता सामाजिक वनीकरण चे कार्यालय मिळत नसल्याने सदर कार्यालय हरवले की काय असा प्रश्न निर्माण होतो..?

0 Response to "म्हसळा सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय हरवले..!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...