मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसल्यात प्रशासकीय कार्यलयांचा मोठ्या प्रमनात बस्तान गुंडाळण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी तथा स्थानिक नेतेमंडळी मात्र आपल्याच भ्रमात..!

म्हसल्यात प्रशासकीय कार्यलयांचा मोठ्या प्रमनात बस्तान गुंडाळण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी तथा स्थानिक नेतेमंडळी मात्र आपल्याच भ्रमात..!


म्हसळा प्रतीनिधि   म्हसळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत असतानाच खासदार.तटकरे साहेबांनाचा तसेच राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अगदी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून निवडून येणार्‍या कोणत्याही लोकप्रतिनिधींना महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी मानाच स्थान असलेल सर्वांनाच ठाऊक आहे. आणि या श्रीवर्धन मतदार संघात म्हसळा तालुक्याच महत्वाच स्थान असलेल अनेक निवडणूकांमधून दिसून येते. मात्र म्हसळा तालुक्यातील जनतेच दुर्दैव की प्रतेक वेळी जनतेला गृहीत मानून जनतेच्या अहिताचे अनेक शासकीय निर्णय घेतले जात असताना याबाबत लोकप्रतिनिधी तथा स्थानिक राजकीय मंडळी याना देखील याबाबत काहीच माहीत नसणे यासारखी दुर्दैवाची बाब नाही. 

आपल्या तालुक्यातील कोणते कार्यालय कुठे आहे हे देखील आताच्या घडीला आमच्या नेतेमंडलीला माहीत नाही आणि याचा फायदा घेत अनेक प्रशासकीय अधिकारी आपापल्या मन मर्जीणे म्हसल्यातील शासकीय कार्यालयांचे बस्तान आपल्याला हवा असलेल्या ठिकाणी हलवित असल्याचे दिसून येते. आणि याचा नाहक त्रास मात्र सर्व सामान्य नागरिकांणा होत असलेला पाहायला मिळत आहे. आणि आमचे नेते फक्त राजकीय निवडणुका आल्या की त्यांच्यातील प्रतींनिधी तथा नेता जागा होतो. आणि असे जेव्हा कार्यालय बदलत असताना आणि इतर सामाजिक समस्यांच्या वेळी मात्र हे नेते आपल्याच भ्रमात असलेले दिसून येतात. 

    याचाच परिचय काही महिन्यांपूर्वी म्हसळा तालुक्यातील कन्याशाळेशेजारी असणारे ’सामाजिक वनीकरण कार्यालय कोणत्याही शासकीय परवानगी शिवाय गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून श्रीवर्धन येथे हलविल्याचे दिसून येते. मात्र याबाबत म्हसळा तालुक्यातील कोणत्याही स्वयंघोषित राजकीय तथा सामाजिक नेत्यांना याबाबत माहीत नसल्याचे दिसून येते. तर अशाच काही नेत्यांमुळे आपला म्हसळा तालुका शिक्षण,क्रीडा,विकास,रोजगार अशा अनेक बाबींमध्ये मागासलेला असल्याचे दिसून येते.

0 Response to "म्हसल्यात प्रशासकीय कार्यलयांचा मोठ्या प्रमनात बस्तान गुंडाळण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी तथा स्थानिक नेतेमंडळी मात्र आपल्याच भ्रमात..! "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...