
श्रीवर्धन तालुक्यातील महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीय युवक एकत्र.
प्रतिनिधी/ संदीप लाड श्रीवर्धन तालुक्यातील आरोग्य,शैक्षणिक,सामाजिक व इतर समाज उपयोगी कार्यासाठी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदेगट),भाजप,मनसे,
शेकाप,काॅग्रेस आदी पक्षातील समविचारी युवकांनी आपल्या विभागातील विविध मुद्दे हाताळण्यासाठी एकत्र येऊन एकमताने सर्वपक्षीय युवक संघटनेची स्थापना केली.त्याच अनुषंगाने आज श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयाला सर्वपक्षीय युवक पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांबाबत भेट दिली. त्यावेळी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत सोनोग्राफी सेंटर,डायलासिस, रुग्णवाहिका,सिझेरियन प्रसुती,बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या असुविधेबद्दल व आरोग्य विभागातील नोकर भरती आदी विषयांवर विस्तृत चर्चा केली व यावर मार्ग काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या याची सर्वपक्षीय युवक पदाधिकाऱ्यांनी माहिती घेतली.आगामी काळात आरोग्य क्षेत्रात श्रीवर्धनच्या नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल नक्कीच आमच्या माध्यमातून दिलासा दिला जाईल असा आशावाद युवक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व दिवेआगर ग्रामपंचायतीचे सरपंच सिध्देश कोसबे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अॅड.जयदिप तांबुटकर, शिवसेना (ठाकरे गट) युवासेनेचे तालुका अधिकारी धवल तवसाळकर, शिवसेना (शिंदे गट) युवासेनेचे तालुका अधिकारी सागर इंगळे,मनसे तालुकाध्यक्ष सुशांत पाटील,भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणय पेडणेकर, युवक काॅग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष हेमंत किर, शेकापचे दिपक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते निलेश नाक्ती आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
0 Response to "श्रीवर्धन तालुक्यातील महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीय युवक एकत्र."
टिप्पणी पोस्ट करा