
केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे सचिव श्री.मुखमित एस.भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न.
अलिबाग :- केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे सचिव श्री.मुखमित एस.भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या विभागाशी संबंधित आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशट्टी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, निलेश घुले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ज्योत्स्ना शिंदे,तहसिलदार विशाल दौंडकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी, अलिबाग मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांची उपस्थिती होती.
बैठकीपूर्वी अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे केंद्रीय सचिव श्री.मुखमित एस. भाटिया यांनी रायगड जिल्हा परिषद ऊर्दू शाळा, सोगाव, एसओएस हॉस्टेल, सोगाव, नगरपालिका ऊर्दू शाळा, अलिबाग, कुलाबा किल्ला येथे भेट देवून पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, सोगावाचे सरपंच उपस्थित होते.
या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केंद्राच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे सचिव श्री.भाटिया यांना अल्पसंख्याकांसाठी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली तर तहसिलदार विशाल दौंडकर यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण माहितीविषयीचे संगणकीय सादरीकरण केले.
0 Response to "केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे सचिव श्री.मुखमित एस.भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न."
टिप्पणी पोस्ट करा