
जासई हायस्कूल मध्ये उरण गट वक्तृत्व स्पर्धा संपन्न.
रविवार, ४ डिसेंबर, २०२२
Comment
उरण (विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील जुनियर कॉलेज दहागाव विभाग जासई ,तालुका उरण जिल्हा रायगड या शैक्षणिक संकुलात शनिवार दिनांक 3/12/2022 रोजी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त 'कृतज्ञता सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे या सप्ताहात विविध शैक्षणिक सामाजिक व क्रीडा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील सर्व शाळांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.याचाच एक भाग म्हणून उरण तालुका गट वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री आणि शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, कामगार नेते सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर या शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य अरुण घाग सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.या स्पर्धेत उरण तालुक्यातील जासई, फुंडे, उलवे, करंजा, पिरकोण ,गव्हाण न्हावे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शरद पवार यांच्या जीवन चरित्रावर विषय घेऊन भाषणे केली. या कार्यक्रमासाठी लाईफ मेंबर प्रमोद कोळी,पिरकोन विद्यालयाचे मुख्याध्यापक जगताप सर, यशवंत घरत,मधुकर पाटील,रघुनाथ ठाकूर,सुभाष घरत व शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस. एस. व विद्यालयातील सर्व सेवक वर्गानी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घरत.पी.जे यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रदर्शन रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख सर यांनी केले.
0 Response to "जासई हायस्कूल मध्ये उरण गट वक्तृत्व स्पर्धा संपन्न."
टिप्पणी पोस्ट करा