
कृष्णा गुट्टे उरण मधील द्रोणागिरी नोड येथून बेपत्ता.
रविवार, ४ डिसेंबर, २०२२
Comment
उरण (विठ्ठल ममताबादे )कृष्णा प्रल्हाद गुट्टे- वय वर्षे 28, व्यवसाय नोकरी, राहणार -रूम नंबर 404, श्रीराज द्वारका बिल्डिंग, प्लॉट नंबर 27,28, सेक्टर 15, द्रोणागिरी नोड, उरण तालुका, जिल्हा रायगड या ठिकाणी कृष्णा गुट्टे राहत असून दिनांक 24/11/2022 रोजी द्रोणागिरी नोड, उरण तालुका येथील आपल्या राहत्या घरातून 7:30 वाजता कोणासही काहीही न सांगता घराबाहेर पडले आहेत. घरच्या नातेवाईकांनी अनेक तास वाट बघितली शेवटी कृष्णा गुट्टे घरी न परतल्याने त्यांचे भाऊ सचिन गुट्टे यांनी कृष्णा गुट्टे हे हरविल्याची तक्रार न्हावा शेवा पोलीस स्टेशन मध्ये केली आहे.
कृष्णा गुट्टे हे द्रोणागिरी नोड येथून हरविले आहेत. वय 28 वर्षे, उंची 5.08 फूट, रंग गोरा, अंगाने मध्यम बांधा, केस काळे व आखूड केस, अंगावर पिवळा फुल शर्ट व काळी पॅन्ट, पायात चप्पल असे वर्णन कृष्णा गुट्टे यांचे आहे. सदर व्यक्ती कोणाला दिसल्यास किंवा आढळून आल्यास न्हावा शेवा पोलीस स्टेशन फोन नंबर 02227472264 तसेच सचिन गुट्टे फोन नंबर -9404444452 यांच्या फोन नंबर वर संपर्क साधावे असे आवाहन न्हावा शेवा पोलीस स्टेशन तसेच गुट्टे परिवारा मार्फत करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "कृष्णा गुट्टे उरण मधील द्रोणागिरी नोड येथून बेपत्ता."
टिप्पणी पोस्ट करा