मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय युवा महोत्सव.

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय युवा महोत्सव.


उरण प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे)कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध 'द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन' या संघटने तर्फे खेळाडू , कलाकार,गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना,कौशल्यांना वाव देण्यासाठी,स्पर्धेतुन उतमोत्तम  गुणीजण खेळाडू, कलाकार तयार करण्याच्या अनुषंगाने मंगळवार  दि 20/12/2022 ते रविवार 25/12/2022 दरम्यान एन एम एस ई झेड मैदान, पेट्रोल पंपाजवळ, बोकडविरा चारफाटा, ता:उरण, जिल्हा-रायगड येथे जिल्हा स्तरीय 22 वा युवा महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गुणवंत राज्यस्तरीय, राष्ट्रीय खेळाडू, कलावंत, कलाकार तयार झाले आहेत. खेळाडू, कलाकार आदि स्पर्धकांसाठी एक उत्तम व्यासपीठ(प्लेटफॉर्म) मिळवून देण्याचे काम द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनने केले आहे. दरवर्षी या स्पर्धेस या युवा महोत्सवाला सर्व राजकीय पक्षाचे नेते,सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते,सिने अभिनेते आवर्जून भेट देत असतात. कोणताही भेदभाव न करता राजकीय पक्ष विरहित असा हा महोत्सव असल्याने दरवर्षी या युवा महोत्सवाला जनतेचाही उत्तम प्रतिसाद मिळतो.दरवर्षी होणाऱ्या युवा महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिंना द्रोणागिरी पुरस्काराने सन्मानित केले जाते.यंदाही विविध व्यक्तिंना द्रोणागिरी पुरस्काराने गौरविले जाणार आहे. यंदा 20 ते 25 डिसेंबर 2022 दरम्यान एन एम एस ई झेड मैदान, पेट्रोल पंपाजवळ, बोकडविरा चारफाटा तालुका उरण, जिल्हा रायगड येथे 22 व्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये डान्स, आर्चरी स्पर्धा, एथलेटिक्स स्पर्धा, देशी खेळ, मैदानी खेळ आदि  वेगवेगळ्या स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा जिल्हास्तरीय युवा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.विशेष म्हणजे या रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सवाला अनेक राजकीय, सामाजिक क्रीडा, कला  अभिनय क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत खेळाडू कलाकार, विविध क्षेत्रातील व्यक्ति यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी द्रोणागिरी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक आदि क्षेत्राशी सबंधित विविध स्पर्धांचा समावेश असतो. अश्या या जिल्हा स्तरीय स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडू, कलाकार व स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी केले आहे.

कोट(चौकट):-

स्पर्धेसाठी प्रवेशिका स्विकारण्याची अंतिम तारीख 15  डिसेंबर 2022 असून स्पर्धकांनी आपले अर्ज व नाव नोंदणी गौरीनंदन अपार्टमेंट, शॉप नंबर 7,चारफाटा उरण जि-रायगड पिन 400702,

ऑफिस फोन नंबर-02227224498 येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेत करायचे आहे dronagiri.sports@gmail.com या ईमेल द्वारेही प्रवेशिका स्वीकारण्यात येईल.अधिक माहितीसाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे खजिनदार शिवेंद्र म्हात्रे-8291616826,

मुकेश घरत -7045028779, 

क्रीडा प्रमुख भारत म्हात्रे-9619596456,

सचिन पाटील -9768485050  यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com


0 Response to "द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय युवा महोत्सव."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...