
उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सप्तसूत्री कार्यक्रमा अंतर्गत पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यावर जातीचे दाखल्यांचे वाटप.
शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२
Comment
उरण प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे ) कोंकण विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी रायगड डॉ महेंद्र कल्याणकर, उप विभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके, तहसीलदार पनवेल विजय तळेकर पनवेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी समाजा साठी राबविण्यात आलेल्या सप्तसूत्री कार्यक्रमा अंतर्गत पनवेल तालुक्यातील वाकडी कातकरी वाडी, हरीग्राम कातकरी वाडी, लहूची कातकरी वाडी, आखाडा कातकरी वाडी, कोरळ वाडी, बानू बाईची वाडी अश्या अनेक वाड्यावर जातीचे दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, रत्नाकर घरत, शेखर कानडे आणि रायगड भूषण दत्ता गोंधळी यांच्या हस्ते सदर दाखल्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी यांनी दिली.
0 Response to "उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सप्तसूत्री कार्यक्रमा अंतर्गत पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यावर जातीचे दाखल्यांचे वाटप."
टिप्पणी पोस्ट करा