
जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचलित,{मराठी माध्यमिक शाळा वरवठणे-आगारवाडा} शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न.!
बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२
Comment
म्हसळा प्रतिनिधी : - गेली अनेक वर्ष शिक्षण पासून वंचित असणार्या खेड्यापाड्यातील गोर गरीब विद्यार्थ्यांना जिजामाता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक आशेचा किरण मिळालं;ए होता.यातूनच अनेक उत्कृष्ट खेळाडू त्तसेच अनेक यशस्वी विद्यार्थी या शाळेतून घडविण्यात आले.मात्र खेड्यापाड्यातील आर्थिक परिस्थिति पाहता कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण देण्याचं काम शालेय प्रशासनाकडून होत असून सर्व सोयी असणारी शाळेची इमारत असावी असे या शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसह संचालक मंडळाचे स्वप्न होते. आणि संस्थेचे संस्थापक श्री.महादेव जी पाटील साहेब यांच्या प्रयत्नांना यश आले,रायगड भूषण तथा समाजसेवक मान.कृष्णा जी महाडीक साहेब यांच्या माध्यमातून शाळेसाठी अनेक दानशूर व्यक्तींची भेट घेऊन शाळेसाठी देणगी मिळाल्याने जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचलित,{मराठी माध्यमिक शाळा वरवठणे-आगारवाडा} या शाळेच्या नवीन इमारतीचा भूमिपूजनाचा सोहळा दिनांक २६ नोव्हेंबर रोजी.दू १.३० वाजता मराठी माध्यमिक शाळा वरवटणे-आगरवाडा शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी उद्घाटक म्हणून मा.श्री.विजयजी नागरथ साहेब, मा.कमलेश मेहता साहेब, मा.सतीश पै.साहेब, मा.बोमी दोतीवाला साहेब, मा.कृष्णा महाडीक साहेब, मा.महादेव पाटील साहेब आदि मान्यवरांसह तसेच शालेय शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचलित,{मराठी माध्यमिक शाळा वरवठणे-आगारवाडा} शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न.!"
टिप्पणी पोस्ट करा