
आंबेतच्या अब्दुल्लाह डबीर याचे नीट यूजी २०२२ परीक्षेत घवघवीत यश ; सर्वत्र कौतुक.!
आंबेत प्रतिनिधी :- वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी अत्यंत महत्वाची असलेल्या नीट युजी २०२२ ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून नॅशनल टेस्टिंग एजन्सीने बुधवारी रात्री उशिरा नीट युजी २०२२ चा निकाल जाहीर केला. या मधे जे.के कॉलेज कॅम्प पुणे व आकाश इन्स्टिट्यूट पुणेचा विध्यार्थी म्हसळा तालुक्यातील आंबेत गावचा सुपुत्र अब्दुल्लाह समीर डबीर याने अनुक्रमे ७२० पैकी ६२५ गुण प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले, अब्दुल्ला याने मिळवलेल्या यशा बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून संपूर्ण जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्यासह वडील समीर डबीर व आई डॉ.रुबूना समीर डबीर यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
१७ जुलै २०२२ रोजी देशभरातील ४९७ शहरांमध्ये आणि भारताबाहेरील १४ शहरांमधील ३,५७० विविध केंद्रांवर नीट युजीची परीक्षा झाली होती. या वैद्यकीय प्रवेश परीक्षेला चांगला प्रतिसाद लाभला होता. परीक्षेला एकूण १७.६४ लाख विद्यार्थी बसले होते. या निकालामध्ये राजस्थानच्या तनिष्काने अव्वल क्रमांक पटकावला आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९.९३ लाखांहून अधिक आहे. यात महाराष्ट्रातील १ लाख १३ विद्यार्थ्यांचा समावेश असून महाराष्ट्र या यादीमध्ये दुसरा क्रमांकावर आहे.
परीक्षेतील यश हा माझ्यासह शिक्षक वर्ग व माझ्या पालकांसाठी आनंदी आणि अभिमानाचा क्षण आहे, आई वडिलांच्या मार्गदर्शना मुळेच मला आज यशाचे शिखर गाठता आला असल्याचे अब्दुल्ला याने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "आंबेतच्या अब्दुल्लाह डबीर याचे नीट यूजी २०२२ परीक्षेत घवघवीत यश ; सर्वत्र कौतुक.!"
टिप्पणी पोस्ट करा