मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सामाजिक कार्यकर्ते श्री.अझहर धनसे यांच्या पाठपुराव्याला यश.. माती माफियांवर रक्कम रु १२.६९४२३.५ दंड तहसीलदार  कार्यालयामार्फत आकारण्यात आला आहे.!

सामाजिक कार्यकर्ते श्री.अझहर धनसे यांच्या पाठपुराव्याला यश.. माती माफियांवर रक्कम रु १२.६९४२३.५ दंड तहसीलदार कार्यालयामार्फत आकारण्यात आला आहे.!


म्हसळा प्रतिनिधी:- म्हसळा तालुक्यातील मौजे मांदाटने गावच्या हद्दीतील स. नं.३७० येथे श्री.इम्तियाज कासिम पठाण यांच्या मालकीच्या असणाऱ्या मिलकतीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध माती उत्खनन सुरू होते. या संदर्भात माहिती घेतली असता,प्रथम दर्शनी योग्य ती माहिती मिळत नव्हती.सर्वत्र उडवा उडविची उत्तरे मिळत होती.अखेर म्हसळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री.अझहर धनसे यांनी या प्रकरणी २९ मे २०२२ रोजी माहिती अधिकारांतर्गत माहिती घेतली असता.सदर माती उत्खनन प्रकरणी शासनाची परवानगी घेण्यात आली नाही.असे समजले तरी यासंदर्भात पुढे तक्रार अर्ज दाखल केला असता. मंडळ अधिकारी खामगाव यांनी चौकशी केली करून, सदर ठिकाणी तब्बल ३२३.४२ ब्रास एवढे अनधिकृत (गौण खनिज) माती उत्खनन केल्याचे आढळून आले.

तरी या संदर्भात तहसील कर्यालयाकडून मौजे मांडाटने येथील स. क्रं ३७० चे मिळकत दार श्री.इम्तियाज कासिम पठाण यांना ४/८/२०२२ रोजी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४८(७) (सन २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १२ दि.१२ जून २०१५) अन्वये नोटीस बजावून ४८ तासांत खुलासा मागवण्यात आला होता.मात्र यासंदर्भात कोणत्याही प्रकारे उत्तर न दिल्याने,तसेच मंडळ अधिकारी खामगाव यांचा अहवाल तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.अझहर धनसे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४८(७).शासन परिपत्रक,क्रमांक ; गौखनि १०/०३१६ /प्र.क्र २६९ ख, दि.१४/०६/२०१७ अन्वये दंड रक्कम रु १२.६९४२३.५ दंड तहसीलदार कार्यालय म्हसळा यांच्या कार्यालयामार्फत आकारण्यात आला आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "सामाजिक कार्यकर्ते श्री.अझहर धनसे यांच्या पाठपुराव्याला यश.. माती माफियांवर रक्कम रु १२.६९४२३.५ दंड तहसीलदार कार्यालयामार्फत आकारण्यात आला आहे.!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...