
श्रीवर्धन तालुक्यातील कुरवडे गावामध्ये पंतप्रधान पिक विमाचे वाटप.!
बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२
Comment
श्रीवर्धन प्रतिनिधी राजू रिकामे : - श्रीवर्धन तालुक्यातील कुरवडे गावामध्ये 'प्रधानमंत्री पिक विमा योजना पाठशाला' कार्यक्रम संपन्न झाला, पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत "माजी पॉलिसी माझ्या हाती" हे अभियान राबवून आंबा, काजू, भातशेती व फळ पिकांच्या विमा योजनेची सविस्तर माहिती शेतकरी व विमा धारक यांना देण्यात आली, भात शेती करता नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व फळबागा यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी विमा स्वरक्षण देण्यात येते उदा. विमाक्षेत्रात मुसळधार पाऊस पडून अथवा ढगफुटी होऊन जलमय झाल्यास, गारपीट पडून पिकांचे नुकसान झाल्यास, विज कोसळल्यामुळे होणारे भूसंकलन अथवा लागणाऱ्या नैसर्गिक आगीमुळे पिकांचे मोठयाप्रमाणात होणारे नुकसान व काढणी पेक्षा नुकसान, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मौसमी म्हणजेच अवकाळी आलेला पाऊस इत्यादी कारणामुळे पिकांची नुकसानी करता विमा संरक्षित रक्कम मिळते.
'एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड' चे श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी आर. ए. करंजकर यांनी माहिती दिली व शेतकऱ्याला पंतप्रधान विमा योजना पॉलिसीचे वाटप करण्यात आले, यावेळी कृषी सहाय्यक अधिकारी पी.एम.पाटील व शेतकरी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.www.fidemihi.com
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "श्रीवर्धन तालुक्यातील कुरवडे गावामध्ये पंतप्रधान पिक विमाचे वाटप.!"
टिप्पणी पोस्ट करा