
राजेवाडी ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याचे साम्राज्य..दुर्गंधी पसरून रोगराईची शक्यता.!
महाड प्रतिनिधी :गेल्या अनेक महिन्यांपासून महाड तालुक्यातील राजेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याचा प्रश्न सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. कित्येक महिन्यांपासून उद्धवलेल्या या दुर्गंधीमुळे राजेवाडी गावात अनेक आजाराचे लक्षणे दिसून आली होती, मात्र या संबंधीत प्रश्नांकडे ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाची गेल्या अनेक वर्षे सत्ता असून अनेक समस्यासह इतर प्रश्न भेडसावत आहेत असे दिसून येत आहेत. राजेवाडी गावात कचऱ्याची व्यवस्था नसून गावामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड तयार झाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे सरपंच, उप-सरपंच, सर्व सदस्य,ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांचे संपूर्ण गावविकासाकडे दुर्लक्ष होत आहे, अधिकारी वर्गाने या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष वेधून या राजेवाडी ग्रामपंचायती सह तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीवर देखील लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.
राजेवाडी ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याची सध्यापरिस्थिती पाहता ग्रामपंचायत नियोजन शून्य कारभार करत आहे. अद्याप कोणतेही नियोजन अथवा स्वच्छता मोहीम सदर राजेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत राबवत नसून त्यामुळे जनतेच्या हिताचा कोणता ही ते विचार करत नाही. विनाकारण ग्रामस्थांना या कचऱ्याचा त्रास सहा करावा लागत आहे. विशेषता राजेवाडी ग्राम. हद्दीत अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तसेच गावामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य तयार झाल्याचे दिसुन येत आहे व ग्रामस्थांचे आरोप आहे, गावातील तरुण मंडळी ने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले नवीन घंटा गाडी १ वर्ष पासून ग्रामपंचायत कार्याला समोर उभी आहे परंतु त्याचा वापर अद्याप झालेला नाही, घंटा गाडी कशासाठी असते गावातील कचऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी की सरपंच, ग्रामसेवक, सर्व सदस्य यांच्या मनमर्जी कारभार करून ग्रामपंचायत कार्याला समोर उभी ठेवून घंटा गाडी चा घंटा वाजवण्यासाठी का? की गावातील नागरिकांना त्रास देण्याचे ग्रामपंचायतीने ठराव घेतले आहेत का?
राजेवाडी ग्रामपंचायत हद्दीत तयार झालेल्या कचऱ्याचे साम्राज्य ४ रोजात गावातील कचऱ्याची साफसफाई करून एक चांगली व्यवस्था करावे अनथा तहसिल कार्यालय समोर उपोषणाला बसणार असा इशारा आमच्या प्रतिनिधीशी बोलताना तरुण मंडळीने दिले आहे.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "राजेवाडी ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याचे साम्राज्य..दुर्गंधी पसरून रोगराईची शक्यता.!"
टिप्पणी पोस्ट करा