
म्हसळा बायपास येथे प्रवाशी आणि एस.टी. कर्मचारी यांच्यात राडा.. सहा.पोलिस निरीक्षक यांचा म्हसळा शहरात आपल्या अधिकारांचा गैरवापर..
सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२
Comment
म्हसळा प्रतिनिधी : सद्या महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत आहे,आणि कोकणातील गणेशोत्सव म्हणजे काय हे नव्याने सांगायला नको. प्रत्येक चाकरमानी जणू वर्षभर आपल्या गणरायाच्या आगमनाकडे डोळे लाऊन असतात. गणेशोत्सव सोबतच गौराई च काळ आगमन झालं याच अनुषंगाने रायगड मध्ये अनेक चाकरमानी मुंबई वरून म्हसळा श्रीवर्धन असा प्रवास करीत असताना,जणू काही या प्रवाशांच्या आनंदावर प्रवासातच काहीस संकट आलं. अर्थात मुंबई-श्रीवर्धन एस. टी ने प्रवास करीत असताना मुंबई मधून जेव्हा प्रवासी गाडीत बसले तेव्हा म्हसळा श्रीवर्धन असा प्रवास करीत असताना ही गाडी संध्याकाळी म्हसळा बायपास येथे पोहोचली असता. गाडी म्हसळा स्थानकात जाणार नाही. असे सांगून म्हसळा मध्ये जाणाऱ्या प्रवाश्यांना बायपास येथे उतरण्यात आले. गडीमधील जवळ जवळ ४०-५०प्रवासी म्हसळा येथे उतरणार होते. मात्र त्यांना आधी कोणतीही कल्पना न देता मध्येच उतरल्यामुळे संतापलेल्या प्रवाष्यानी गाडी रोखून धरली. तसेच म्हसळा शहरात गाडी का नाही नेत याबद्दल विचारणा केली असता. एस. टी कर्मचारी यांनी अरेरावी करत. तुम्ही इथे गाडी थांबलीत तरी चालेल. आम्ही इथेच गाडीत झोपून राहू आम्हाला काही फरक पडत नाही. अशी उद्द्ट पने उत्तरे दिली. तर प्रवाशी आपल्या प्रश्नांवर ठाम होते की,गाडीत अनेक वयस्कर मंडळी आहेत. त्याचबरोबर अनेक म्हसळा तालुक्यातील खेडेगावात राहणारी मंडळी आहेत. ज्यांना म्हसळा शहरातून गाडी बदलून प्रवास करावा लागतो. मात्र प्रशासनाच्या या अन्यायी धोरणामुळे बायपास येथे उतरून पुन्हा म्हासल्यामध्ये रिक्षा ने जावं लागत.तर अनेक स्थानिक प्रवासी यांना सुद्धा अनेक वेळा या प्रश्नांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा याबाबत एस.टी. प्रशासनासोबत चर्चा केली असता. पोलिस अधिकारी यांनी हे आदेश काढले असल्याचे सांगण्यात आले. यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की, म्हसळा पोलिस अधिकारी पोलिस सहा.निरीक्षक यांना दुसऱ्या विभागात हस्तक्षेप करण्याचे अधिकार कुणी दिले. तर एकीकडे काही दिवसांपासून म्हसळा शहरात सुरू असलेल्या जुगार आणि मटका खेळाच्या संदर्भात पोलिस डोळेझाक करीत असल्याने तसेच आता हे बायपास प्रकरण पाहता. म्हसळा पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक यांच्या कामाबाबत लोकांमध्ये संशयास्पद भूमिका दिसून येते. कारण समाजाच्या हिता ऐवजी अनहित कसे होईल याकडे लक्ष दिले जात आहे.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "म्हसळा बायपास येथे प्रवाशी आणि एस.टी. कर्मचारी यांच्यात राडा.. सहा.पोलिस निरीक्षक यांचा म्हसळा शहरात आपल्या अधिकारांचा गैरवापर.."
टिप्पणी पोस्ट करा