मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कोकणातील बहुचर्चित असा आंबेत म्हाप्रल पुलासाठी लढा उभा; संघर्ष समितीची स्थापणा

कोकणातील बहुचर्चित असा आंबेत म्हाप्रल पुलासाठी लढा उभा; संघर्ष समितीची स्थापणा


प्रतिनिधी - अबरार अमीन 

आंबेत येथे काळ शुक्रवार दिनांक ०९/०९/२०२२ रोजी रायगड रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत म्हाप्रल पुला संदर्भात आम बैठकीचे आयोजन आंबेत येथील शासकीय विश्रामगृहात सामाजिक कार्यकर्ते मुफ्ती खालिद झटाम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले,या वेळीस सर्वमते हे ठराव करण्यात आले की नवीन पुल बांधण्या आदी जुन्या पुलाचा रखडलेला काम पुन्हा सुरू करून पुल वाहतुकीस खुला करण्यात यावा तसेच जन आंदोलन आणि वेळ पडल्यास जनहित याचिका ही टाकण्याची तय्यारी असल्याचा या वेळीस समजलं. नवीन पुल झाल्या नंतर त्याला "बॅरिस्टर.ए आर अंतुले सागरी सेतू" असे नाव देण्यात यावा हा ही एकमुखी ठराव बैठकी दरम्यान करण्यात आला. दोन जिल्ह्यातील शेकडो नागरिक सादर बैठकीस उपस्थित राहून प्रत्येकांनी पुला संदर्भात आप आपले मत व्यक्त केलं.

गेल्या तीन वर्षात जे दुरुस्त्या करण्यात आले ते असमाधानकारक असल्याने पुल पुन्हा एकदा बंद करण्यात आला, पुलाचा २ नंबर खांबा कमकुवत आहे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने आंबेत म्हाप्रल पुल वाहतुकीस बंद केला.चुकीच्या पद्धतीने ऑडिट केल्याने 12 कोटी खर्च करून पुल आद्याप बंद अवस्थेत आहे या मुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असताना देखील राजकीय नेते व शासकीय अधिकारी झोपेचं सोंग घेतल्या सारखा वागत आहेत हे पाहता रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो नागरिकांनी एकत्र येत पुलासाठी लढा देण्याचा निश्चय केला असून पुढील काही दिवसात जन आंदोलन करण्याचा इशारा ही दिला. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मुफ्ती खालिद झटाम यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यी 'सावित्री नदी खाडी पट्टा रायगड रत्नागिरी संघर्ष समिती' ची स्थापना करण्यात आली,जी खालील प्रमाणे आहेत.


मुफ्ती खालिद झटाम - अध्यक्ष (सामाजिक कार्यकर्ते), जमीर मखजानकर - कार्याध्यक्ष, फारुक हजवाने - उपाध्यक्ष, फरीद डावरे - सल्लागार, गणेश म्हाप्रलकर - सचिव, फरीद उबारे - खजिनदार, सज्जाद हस्वारे, मुझफ्फर मुकादम, अझहर मुकादम, अकरम झटाम, यशवंत गमरे, मुकेश आंबेकर, अबरार अमीन, शाहनवाज डावरे, कैस उबारे.

या वेळीस आमच्या प्रतिनिधीशी बोलताना समितीचे अध्यक्ष.मुफ्ती खालिद यांनी दोन्ही जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांना या लढ्यात शामील होण्याचे आवाहन केले असून हा लढा आंदोलन पुरता मर्यादित नसून वेळ पडल्यास समितीच्या माध्यमातून जनहित याचिका टाकण्याची तय्यारी असल्याचा सांगितली.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "कोकणातील बहुचर्चित असा आंबेत म्हाप्रल पुलासाठी लढा उभा; संघर्ष समितीची स्थापणा"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...