म्हसळा शहरात मटका जुगार व्यावसायिकांसाठी गणेशोत्सव जोरात.!
शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२
Comment
म्हसळा प्रतिनिधी : - म्हसळा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जुगार आणि मटका संदर्भातील बातम्या पाहून व्यावसायिक थोडे शांत असलेले दिसून येतात. मात्र पद्धतशीर पणे मुंबई वरून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आलेले चाकरमानी तसेच म्हसल्यातील सर्वसामान्य लोकांना लुटणारा आपला मटका जुगार व्यवसाय पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून सुरू असल्याचे दिसून येते.म्हसळा शहरात मटका जुगार व्यावसायिक पोलेकर यांची माणसे आता अड्डा सोडून म्हसळा दिघी नाका येथील हॉटेल टपरी तसेच होळी चे मैदानात जुगारी लोकांना भेटून त्यांच्याकडून पैसे आणि डाव कागदावर लिहून घेतात तसेच मोबाईल मध्ये लिहून किंवा फोटोकडून घेतात. आणि त्याप्रमाणे डाव लावतात.
मात्र हे सगळ खरचं पोलिसांची नजर चुकवून सुरू आहे. की पोलिस प्रशासन त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे. हे समजायला मार्ग नाही तसेच गेल्या अनेक दिवसांपासून म्हसळा पोलिस ठाण्याच्या आवारात मटका जुगार व्यावसायिकाचा वावर हे पाहता नेमका हा व्यवसाय कुणाचा पोलेकर की कुण्या अधिकारीचा? पोलिस अधिकारी यांच्या नजरेसमोर सगळं सुरू असून पोलिस गप्प का? पोलेकर आणि म्हसळा श्रीवर्धन पोलिस कर्मचारी यांच काही कनेक्शन आहे का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. तर या संदर्भात लवकरच पुराव्यानिशी पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन जर पोलिसांकडून कारवाई झाली नाही तर म्हसळा श्रीवर्धन तालुक्यात एखाद्या कार्यतत्पर पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. या संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे.
म्हसळा प्रतिनिधी : - म्हसळा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जुगार आणि मटका संदर्भातील बातम्या पाहून व्यावसायिक थोडे शांत असलेले दिसून येतात. मात्र पद्धतशीर पणे मुंबई वरून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आलेले चाकरमानी तसेच म्हसल्यातील सर्वसामान्य लोकांना लुटणारा आपला मटका जुगार व्यवसाय पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून सुरू असल्याचे दिसून येते.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "म्हसळा शहरात मटका जुगार व्यावसायिकांसाठी गणेशोत्सव जोरात.!"
टिप्पणी पोस्ट करा