
म्हसळ्यात ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न.!
प्रतिनिधी - अबरार अमीन : म्हसळा तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक ज्यांनी शिवसेना वाढीसाठी सुरुवातीपासून प्रयत्न केले व शून्यातून शिवसेना मोठी केली अशा प्रामाणिक व निष्ठावान शिवसैनिकांचा सत्कार सोहळा व कार्यकर्त्यांचा मेळावा दि.०२/०९/२०२२ रोजी सार्वजनिक वाचनालय.म्हसळा येथे रायगड जिल्ह्याचे नवनियुक्त संपर्क प्रमुख श्री.संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी शिवसेनेचे जेष्ठ रामकृष्ण सावंत, अशोक म्हशिलकर, रमेश विचारे, सदानंद शिर्के,दिलीप पानसरे, विजय लांजेकर, दत्तात्रय अंजारलेकर, जयवंत सावंत सह ३५ ज्येष्ठ शिवसैनिकांचा शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्री.संजय कदम व शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.अनिल नवगणे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व स्व.बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी रायगड जिल्ह्याचे नवनियुक्त संपर्क प्रमुख.संजयजी कदम म्हणाले की शिवसेनेचा झंझावत घराघरात पोचवण्याचे काम ३५-४० वर्षापासून शिवसैनिक करत आहेत. अशा कट्टर शिवसैनिकांना वंदन करणे, त्यांना मानसन्मान देणे आणि त्यांचा सत्कार करणे हे सध्याच्या शिवसैनिकांचे आद्यकर्तव्य आहे.आजचा हा उपक्रम स्तुत्य असून प्रत्येक जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करावा असे आवाहन केले.
दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख.अनिल नवगणे म्हणाले की कोरोनाच्या काळात खर्या अर्थाने शिवसैनिकांनीच जनतेला मदतीचा हात दिला. आता यापुढील सर्व निवडणुका सुद्धा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन केले.
माजी तालुका प्रमुख श्री.नंदू शिर्के यांनी जुन्या शिवसैनिकांचा कार्य काय यावर माहिती विषद केली व अजून काही ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ज्यांचा सत्कार वेळे आभवी करता आला नाही अशा ज्येष्ठ शिवसैनिकांचा येणाऱ्या दिवसात सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
सदर मेळाव्यास जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, क्षेत्र संघटक श्रीवर्धन मतदार संघ रविंद्र लाड, दिलीप करंदीकर, अनिल काप, माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के, मुकेश पवार, गजानन शिंदे, राजाराम तिलटकर, शहर प्रमुख अनिकेत पानसरे, नगरसेविका राखी करंबे, अनंत नाक्ती, राजू जाधव, दीपल शिर्के, कौस्तुभ करडे, संतोष सुर्वे, अजय करंबे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "म्हसळ्यात ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न.!"
टिप्पणी पोस्ट करा