मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा नगराध्यक्ष श्री.असहल कादरी यांचा मदतीचा हाथ, ४४ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.!

म्हसळा नगराध्यक्ष श्री.असहल कादरी यांचा मदतीचा हाथ, ४४ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.!


म्हसळा विशेष प्रतिनिधी :- आपण सर्वांचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतुन आपण गरजूंसाठी कार्य केले पाहिजे. प्रत्ये विद्यार्थ्यांना वाटते आपण चांगले शिक्षण घेवुन मोठे झालो पाहिजे. परंतु आर्थिक परस्थिती नसल्याने काहींचे स्वप्न अपुर्ण राहतात. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळाली, तर ते आपले ध्येय गाठण्यासाठी धाव घेतील. शिक्षणांची आवड निर्माण होऊन एक चांगली पिढी तयार होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन  म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष असहल कादरी यांनी केले.रा.जी.प उर्दू शाळेतील 44 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.यावेळी कादरी यांनी शाळेला पाण्याची टाकी तसेच सरंक्षण भिंत सुद्धा बांधून दिली.

तसेच गावातील काही माजी विद्यार्थी यांनी सुद्धा या शाळेला  रंग रोगन व किरकोळ कामासाठी  हातभार लावला तसेच माजी विद्यार्थी  जमील उकये यांनी सुद्धा शाळेला पिण्याच्या पाण्याचे फिल्टर दिले.

गणवेश वाटप करत असताना नगराध्यक्ष असल कादरी नगरसेवक नासिर मिठागरे ,केके न्यूज संपादक नईम दळवी  खारगावचे उपसरपंच अकमल कादरी  समाजसेवक इस्माईल दोंदिलकर, इक्बाल वस्ता, यांची उपस्थिती होती.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "म्हसळा नगराध्यक्ष श्री.असहल कादरी यांचा मदतीचा हाथ, ४४ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...