
म्हसळा पोलिस ठाण्याच्या आवारात मटका व्यावसायिकाचा वावर नेमकी भानगड काय..?
मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२
Comment
म्हसळा प्रतिनिधी :- गेल्या अनेक दिवसांपासून म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात मटका आणि जुगार खेळाच्या माध्यमातून गोर गरीब लोकांना खेळाचे व्यसन लागून अनेकांचे संसार उघड्यावर आले असल्याचे दिसून येते.आणि या संदर्भात अनेक वेळा सामाजिक कार्यकर्ते पोलीस ठाण्यात तक्रार करीत असून पोलिस अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात.यातच काही दिवसांपासून मटका जुगार व्यावसायिक श्री. पोळेकर यांच्या माध्यमातून म्हसळा शहरातील व्यवसाय सांभाळणारे श्री.बिरवाडकर ही व्यक्ती खुलेआम म्हसळा पोलिस ठाण्याच्या आवारात आणि कार्यालयात आढळून येतो.
खरंतर पोलिस विभागासारख्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणी जिथे काही गुप्त तसेच महत्वाची माहिती असते. अशा ठिकाणी अनोळखी माणसाचा वावर नेमक कोणत्या कारणामुळे होतो. आणि पोलिस सहा. निरीक्षक तसेच पोलिस अधिकारी अशा व्यक्तीला पोलिस ठाण्याच्या आवारात प्रवेश कसा मिळतो हे न सुटणार कोड आहे.
तसेच सदर व्यक्ती म्हसळा शहरात सुरू असलेल्या जुगार आणि मटका खेळाच्या व्यावसायिक आहे. तरीही या व्यक्तीच पोलिस ठाण्याच्या आवारात असन हे कुठेतरी संशयास्पद आहे.
तसेच पोलिस अधिकारी यांनी केलेल्या कारवायांमध्ये आज पर्यंत यश न मिळण्याचे कारण काय? मग नेमके म्हसळा शहरातील मटका जुगार व्यावसायिकांना नेमक अभय कुणाच? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "म्हसळा पोलिस ठाण्याच्या आवारात मटका व्यावसायिकाचा वावर नेमकी भानगड काय..?"
टिप्पणी पोस्ट करा