मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आंबेत मध्ये मतदार ओळखपत्र ; आधार जोडणी शिबिर संपन्न!

आंबेत मध्ये मतदार ओळखपत्र ; आधार जोडणी शिबिर संपन्न!


आंबेत प्रतिनिधी- अबरार अमीन : आंबेत येथ मा.म्हसळा तहसीलदार.समीर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी कार्यालय व ग्रुप ग्राम पंचायत.आंबेत यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ऑगस्ट रोजी पंचायत कार्यालय येथे मतदार ओळख पत्र जोडणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,लोकसभा व विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मतदार यादी आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे मतदारांची ओळख पटवणे, मतदार यादीत समाविष्ट असलेल्या माहितीची पडताळणी करणे सोपे होणार आहे. यासोबतच एकापेक्षा जास्त मतदारसंघात नावे नोंदवणाऱ्यांची ही ओळख पटवली जाणार आहे. या शिबिरात ९० मतदारांचे मतदान कार्ड आधार सोबत जोडण्यात आले.या सोबतच इ-पीक पाहणी व पी.एम किसान ई-के.वाय.सी करण्याबाबत जन जागृती करण्यात आली.

सदर शिबिराला तलाठी.जे आर शेळके, निवडणूक लिपिक. अमर ठमके, मतदार केंद्र स्तरीय अधिकारी.साजिद कडू, मंगेश साळवी, आंबेत सरपंच सौ.अफरोजा डावरे, पंचायत सदस्य, पंचायात कर्मचारी.नंदन गोसावी, संतोष आंबेतकर, मुफ्ती खालिद झटाम,मकबूल अंतुले सह महिला व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. या उपक्रमाबद्दल सरपंच.अफरोजा डावरे यांनी सांगितले की अशा शिबिराचे आयोजन प्रत्येक गाव व शहर स्तरावर आयोजित करण्यात यावे जेणे करुन नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होईल.तसेच सामाजिक कार्यकर्ते मुफ्ती खालिद यांनी या उपक्रमाची प्रशंसा करत शिबिर आयोजकांचा सत्कार केला.

या शिबिरामध्ये ९० मतदारांचे मतदान कार्ड आधार सोबत जोडल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली व सदर उपक्रम अजून ४ महिने मतदार केंद्र स्तरीय अधिकारी यांच्या कडे चालू राहील अशी माहिती निवडणूक अधिकारी.अमर ठमके यांनी दिली व सर्व नागरिकांनी आपले मतदार कार्ड आधारशी जोडून घ्यावा असे आवाहन केले.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "आंबेत मध्ये मतदार ओळखपत्र ; आधार जोडणी शिबिर संपन्न!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...