मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा श्रीवर्धन सह रायगड जिल्ह्याला मटका,जुगार खेळाच्या राक्षसाचा विळखा!

म्हसळा श्रीवर्धन सह रायगड जिल्ह्याला मटका,जुगार खेळाच्या राक्षसाचा विळखा!


म्हसळा प्रतिनिधी
:- गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण देश भरासह रायगड जिल्ह्याला कोरोना सारख्या वइषणून निर्माण केलेली दहशत आज ही ती भीती लोकांच्या मनामध्ये घर करून बसली आहे.मात्र काही वर्षांपासून समाजामध्ये आणखी एका मोठ्या राक्षसान थैमान घातलं आहे.आणि तो राक्षस म्हणजे मटका जुगार खेळ!

अनेक गोर गरीब लोकांचे संसार या खेळाच्या व्यसनामुळे उघडे पडले,तर कैक श्रीमंत लोकांचे दिवाळे निघाले. करोडपती अक्षरशः रोड पती झालेले दिसून येतात.मात्र या अशा समाज विघातक खेळाला शासकीय मान्यता दिलेली नसली तरी.म्हसळा , श्रीवर्धन, बोर्ली सारख्या सह रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रशासन तथा पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार करून सुद्धा पोलिस अधिकारी अगदी मुग गिळून गप्प असलेले दिसून येतात.तर सतत तक्रार केली तर थातूर मातूर कारवाई करून येताना दिसून येतात.तर येत्या सणासुदीच्या दिवसात या खेळांच्या अड्यावर कारवाई करणार का ? हा प्रश्न उभा राहतो. तर याहून पुढे या खेळाच्या मालकांची नाव माहीत असून सुद्धा पोलिस अधिकारी जर कारवाई करत नसतील तर या मालकांना पोलिसांचा वरदहस्त लाभलेला आहे का?

हे धंदे नेमके कुणाचे पोळेकर सारख्या मालकांचे की अन्य कुणाचे? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.तर किमान म्हसळा, बोर्ली,श्रीवर्धन चे उप विभागीय पोलिस अधिकारी तसेच म्हसळा,बोर्ली, च्या पोलिस अधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार का?

एकंदर पाहिलं तर म्हसळा,श्रीवर्धन,बोर्ली या शहरांना मटका जुगार च्या राक्षसापासून कुणी सुटका करेल का? अस एकंदर सगळीकडे ऐकायला मिळत आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "म्हसळा श्रीवर्धन सह रायगड जिल्ह्याला मटका,जुगार खेळाच्या राक्षसाचा विळखा!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...