मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अवैध धंदे जोमात... तर अनेक समाजातील सर्वसामान्यांचे कुटुंब कोमात...

अवैध धंदे जोमात... तर अनेक समाजातील सर्वसामान्यांचे कुटुंब कोमात...


श्रीवर्धन कोलमांडला प्रतिनिधी - सोपान निंबरे
; श्रीवर्धन तालुक्यातील शहरासह काही खेडेगावांमधील परिसरात मटका व अन्य अवैधरित्या धंद्याला पुन्हा एकदा सुळसुळाट झाले असल्याची दिसून येत आहे व याची नागरिकांमध्ये मोठ्याने चर्चा सुरू आहे. सर्रासपणे अवैध धंदेवाईक यांनी अक्षरशः कहर केले असून अवैध धंदे चालू असल्याने या भागामध्ये मटका, गावठी दारू, देशी, माडी यांची छुप्पे पद्धतीने दुकाने थाटली आहेत.  तालुक्यात अवैध धंदे जोमात चालू असल्याने अनेकांचे संसार कोमात (उध्वस्त) होत आहेत. श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या धंदे जोमात चालू असल्याने पोलिसांचे काम संशयास्पद आहे. कारण बेकायदेशीर धंदेवाल्यांवर ना कोणाचा धाक आहे ना दरारा, पोलीस खात्याला हे अवैध धंदेवाले जुमानत सुद्धा नाहीत.  कोण पोलीस... कोणीही पोलीस आमचे काहीही करू शकत नाही असे म्हणण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.

अवैध धंदेवाईकांनी तालुक्यातील काही पक्ष्याचे पुढारी आणि प्रतिष्ठित लोकांना जवळ करून आपला धंदा जोमात थाटला आहे.. की काय असे अनेक सवाल येथील नागरिक करीत आहेत. पोलीस प्रशासनाने वेळीच यांना लगाम नाही घातल्यास याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जनतेला आणि पोलीस प्रशासन यांना सहन करावे लागणार आहे. या भागातील पोलीस अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले असून त्यांच्या या भागात अवैध धंद्यांवर कोणत्याही प्रकारचा धाक नसल्याने या धंदेवाल्यानी धंदे बेकायदेशीर पणे चालू असल्याचे  नागरिक बोलत आहेत अवैध धंदे जोमात असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. पोलिस प्रशासनाने  यांना वेळीच येणाऱ्या गणपती उत्सवाच्या आधीच धडा शिकवणे गरजेचे आहे. असे उध्वस्त होत असलेल्या सौसारी महिलांची व समाजातील सुज्ञान नागरिकांची मागणी आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "अवैध धंदे जोमात... तर अनेक समाजातील सर्वसामान्यांचे कुटुंब कोमात..."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...