मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सांगली जिल्हा परिषदेने शिक्षणसेवकांप्रती घेतलेला निर्णय रायगड जिल्हा परिषद कधी घेणार, रायगड जिल्हा परिषद शिक्षणसेवकांप्रती उदासीन का...?

सांगली जिल्हा परिषदेने शिक्षणसेवकांप्रती घेतलेला निर्णय रायगड जिल्हा परिषद कधी घेणार, रायगड जिल्हा परिषद शिक्षणसेवकांप्रती उदासीन का...?


म्हसळा प्रतिनिधी : राज्यात सन २०१९ मध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षणसेवक भरती झाली. सदर शिक्षणसेवकांचा परिविक्षाधीन कालावधी सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्ण होऊन त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करायचे असतात. काही जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाने या प्रक्रियेला सुरुवात देखील केलेली आहे. सांगली जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितेंद्र डूडी साहेब यांनी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व शिक्षणसेवकांचे नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचे प्रस्ताव विशेष शिबिर लावून १० ऑगस्ट मागवून घेतले आहे. या महत्त्वाच्या निर्णयाबाबत त्यांनी विशेष शिबिर राबवून घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. सांगली जिल्ह्यातील जवळपास ४५० शिक्षणसेवक यांना दिवाळीपूर्वी नियमित वेतनश्रेणी लागू करून दिवाळी भेट देण्याच्या निर्धार सांगली जिल्हा परिषदेने केलेला आहे.  

      याउलट, विपरीत परिस्थिती रायगड जिल्हा परिषदेत दिसून येत आहे.  रायगड जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्तावाचा नमुना देखील शिक्षण विभागातून जाहीर केलेला नाही. पुढील महिना सप्टेंबर असताना, गणपती, दिवाळी तसेच इतर सणांच्या सुट्ट्यांमध्ये महिने लोटत असताना प्रस्ताव सादर करायला शिक्षणसेवक यांना पुरेसा वेळही हवा. तेव्हा जिल्हा परिषदेतून नियमित वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भातील प्रस्त्वाबाबतचे पत्र आता येणार नाही तर कधी येणार....??? हा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. नेहमीप्रमाणे रायगड जिल्हा परिषद मुद्दामून उशीर करून, नंतर वेठीस धरून आर्थिक शोषण करेल असा विषय आता खाजगीत बोलल्या जात आहे. रायगड झेड पीत पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही हे सर्वश्रुत आहे. चहा टपरीवरील चर्चेचा विषय होऊन बसलेला आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यात वेठीस धरून आर्थिक शोषण होत असेल तर ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. जर का असे घडत असेल तर याविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा निर्धार देखील शिक्षणसेवक यांनी केलेला आहे. आधीच ६००० मानधनावर ३ वर्ष शिक्षणसेवकांनी हलाखीचे दिवस काढले आहेत. त्यांची व्यथा त्यांनाच ठाऊक..! तेव्हा त्यांचे आर्थिक शोषण करून त्यांच्या अंतकरणाचा तळतळाट कोणी घेऊ नये म्हणजे झालं...!  सांगली जिल्हा परिषदेसारखा मानवतावादी निर्णय रायगड जिल्हा परिषदेतील सीईओ साहेबांनी त्वरित घ्यावा. सांगली जिल्हा परिषदेप्रमाणे जिल्ह्यातील शिक्षण विभागात कुणाचेही आर्थिक शोषण होऊ न देता दिवाळीपूर्वी नियमित वेतनश्रेणी लागू करून यंदाच्या दिवाळीत त्यांच्याही ताटात गोडघोड आले की सुखद अंतकरणाने शिक्षणसेवक प्रशासनाचे आभार मानतील. तेव्हा रायगड जिल्हा परिषदेने लवकरात लवकर नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची प्रक्रिया राबवावी अशी विनंती सर्व शिक्षक संघटनांकडून होत आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "सांगली जिल्हा परिषदेने शिक्षणसेवकांप्रती घेतलेला निर्णय रायगड जिल्हा परिषद कधी घेणार, रायगड जिल्हा परिषद शिक्षणसेवकांप्रती उदासीन का...?"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...