मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ची शहर कमिटी जाहीर..!

म्हसळा येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ची शहर कमिटी जाहीर..!


म्हसळा प्रतिनिधी :- दिनांक - ८ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार. मा.श्री सुनील जी तटकरे यांच्या आदेशानुसार संघटना मजबुतीकरणाच्या उद्देशाने राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली. या अनुषंगाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. प्रसाद पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार म्हसळा शहर अध्यक्ष रा. वि. काँ श्री.शाहनवाज उकाये यांच्या माध्यमातून शहर कमिटी जाहीर करण्यात आली. तसेच श्रीवर्धन मतदार संघाचे आमदार कु. आदितीताई तटकरे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी म्हसळा तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

म्हसळा शहर राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस संघटनाच्या वतीने संघटनांचे अध्यक्ष श्री.शाहनावाज उकये यांची माजी पालकमंत्री तथा श्रीवर्धन मतदारसंघातली आमदार कु.आदितीताई तटकरे यांच्याकडे मागणी म्हसळा तालुक्यातील वरवठणे, येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) मध्ये डिझल मेकॅनिक कोर्स करण्या करता लागणारे सर्व साहित्य व सर्व सुविधा संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. तसेच डिझल मेकॅनिक कोर्स करण्यासाठी म्हसळा मध्ये अनेक मुला/मुली इच्छुक आहेत. सदर कोर्स सुरु करण्यासाठी विनंती अर्ज सादर करण्यात आला आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "म्हसळा येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ची शहर कमिटी जाहीर..!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...