
हर घर तिरंगा अंतर्गत आंबेत मध्ये जागृती फेरी, विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचा ही उतस्फूर्त सहभाग.!
आंबेत प्रतिनिधी - अबरार अमीन :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आंबेत मध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये गावातील सर्व शाळातील विद्यार्थी, शिक्षक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. ही अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाची जागृती फेरी यशस्वीरित्या होण्यासाठी सर्व शाळांनी विषेश प्रयत्न केले.
मंगळवारी सकाळी दहा वाजता आंबेत गावातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जागृती प्रभात फेरीचे सुरुवात करण्यात आली. या फेरी मधे सावित्री माध्यमिक विद्या मंदिर, जि.प.प्राथमिक शाळा व बॅरिस्टर.अब्दूर रहमान अंतुले इंग्लिश स्कूलने ही या मध्ये सहभागी होऊन विशेष सहकार्य केले.
सहभागी होणारे विद्यार्थी क्रांतिकारक, स्वातंत्र्य लढ्यातील नेते अश्या वेषात सहभागी झाले होते,तसेच देश भक्तीपर गीते, गजिनृत्य, लेझिम आदींचा समावेश ही होता.ही जागृती फेरी सावित्री माध्यमिक विद्या मंदिर शाळेतून बाहेर निघून गावच्या मुख्य प्रवेशद्वारा पासून सुरू करण्यात आली,पुढे आंबेत ग्राम पंचायत, स्टेट बँक, पोस्ट ऑफिस करत पोलिस चेकपोस्टहून पुंन्हा गावच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ येऊन झाली.
या प्रभात फेरीचे नियोजन शेख अय्याज सर व श्री. लुबाल सर यांनी मुख्याध्यापक श्री.भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केली. या मध्येच सावित्री माध्यमिक विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांतिकारी नेते स्वातंत्र्य सेनानी व महापुरुषांचे वेश परिधान करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते या बद्दल श्री.भोसले सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केलं.
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "हर घर तिरंगा अंतर्गत आंबेत मध्ये जागृती फेरी, विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचा ही उतस्फूर्त सहभाग.!"
टिप्पणी पोस्ट करा